स्व. आ. संजयसिंह गायकवाड पतसंस्थेची उत्तुंग भरारी; तब्बल २६ लाखांचा नफा!

२३ व्या वार्षिक सभेत उत्साहाचे वातावरण; कोल्हापूर व कळे शाखेसह विस्तार वेगात.
Sanjay Singh Gaikwad Pat Sanstha Kotoli
स्व. आ. संजयसिंह गायकवाड पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार.
Published on

कोतोली : येथील स्व. आ. संजयसिंह गायकवाड नागरी सहकारी पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. गेल्या आर्थिक वर्षात संस्थेने चमकदार कामगिरी करत २६ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून, सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत उद्योजक सोपान पाटील उपस्थित होते. संस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, कोतोली येथील मुख्य शाखेसोबतच कोल्हापूर आणि कळे येथेही पतसंस्थेचा विस्तार करण्यात आला आहे. ग्राहकांचा वाढता विश्वास आणि उत्कृष्ट सेवेच्या जोरावर संस्थेकडे सध्या १७ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. येत्या काळात ठेवींचा हा टप्पा २५ कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट संस्थेने ठेवले आहे.

सभेच्या सुरुवातीला प्रिया बुराण यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम चौगुले यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून संस्थेच्या आर्थिक स्थितीचा लेखाजोखा सभासदांसमोर मांडला.

या वार्षिक सर्वसाधारण सभेला संस्थेचे व्हाईस चेअरमन सुरेश माने यांच्यासह संचालक मंडळातील प्रकाश चौगुले, महादेव चौगुले, रामानंद गुरव, बाळू पोवार, सुनीता चौगुले आणि गोगीनी गंधवाले यांच्यासह इतर मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या शेवटी प्रकाश पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Banco News
www.banco.news