समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या सासवड शाखेचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न

सासवडमध्ये समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन शाखेचे उत्साही उद्घाटन
समता नागरी सहकारी पतसंस्था
सहकार आयुक्त दीपक तावरे, माजी सहकार आयुक्त व निवडणूक आयुक्त अनिल कवडेसमता नागरी सहकारी पतसंस्था
Published on

पुरंदर तालुक्यातील अग्रगण्य समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या सासवड शाखेचा उद्घाटन समारंभ सोमवार, दि. २८ जुलै रोजी अत्यंत उत्साहात पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे, माजी सहकार आयुक्त व निवडणूक आयुक्त अनिल कवडे, अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर व शैलेश कोतमिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप फरांदे यांनी करताना संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेने आजवर २५१ कोटींच्या ठेवी, १७२ कोटींचे कर्जवाटप व ०% एन.पी.ए. राखत सातत्याने नफा मिळवला असून, सभासदांना नियमित लाभांश दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्घाटक सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी संस्थेच्या पारदर्शक कारभाराचे कौतुक करत "समता पतसंस्थेचा आदर्श इतर संस्थांनी घ्यावा," असे मत व्यक्त केले. “शाखा वाढवण्याऐवजी व्यवसायवाढीस प्राधान्य द्या,” असा सल्लाही त्यांनी दिला.

समता नागरी सहकारी पतसंस्था
संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व सभासदसंस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व सभासद

कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल कवडे यांनी प्रामाणिकपणावर भर देत, “प्रामाणिकपणा टिकवणे ही काळाची गरज आहे,” असे सांगितले. त्यांनी ठेवींना संरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली. “अवयवदान ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे,” असे आवाहन करत समाजा प्रती जबाबदारीची जाणीव प्रत्येकाने ठेवावी, असे मत मांडले.

अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर यांनी “समता पॅलेस” सभागृहाच्या निर्मितीचे कौतुक करत, संस्थेच्या कार्यपद्धतीची प्रशंसा केली. “गेल्या दोन वर्षांत एकही त्रुटी नसलेली ही संस्था आहे,” असे त्यांनी सांगितले. माजी अप्पर आयुक्त शैलेश कोतमिरे यांनी संस्थेची आर्थिक स्थिती सक्षम असून, भविष्यातील वाटचालही सुदृढ दिशेने चालू असल्याचे नमूद केले.

संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व सभासद
उद्घाटक सहकार आयुक्त दीपक तावरे संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व सभासद

या प्रसंगी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, उपनिबंधक मिलिंद सोबले, सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम, ज्येष्ठ नेते विजय कोलते, सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, सतिश काकडे, प्रमोद काकडे, दत्ता चव्हाण, राजेश काकडे, विराज काकडे, शैलेश रासकर, आर. एन. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी पतसंस्थेचे मुख्य कार्यालय निरा येथे असून, बारामती हडपसर तर आता चौथी शाखा सासवड येथे नव्याने सुरुवात करण्यात आली आहे. या पतसंस्थेची संपूर्ण माहिती, लेखाजोखा, अहवाल,ताळेबंद, सविस्तर माहिती युवराज फरांदे सचिव तथा मुख्य व्यवस्थापक यांनी ही माहिती दिली. यावेळी पुरुषोत्तम जगताप, माणिक झेंडे, राजन शहा, राजेंद्र जैन, डॉ. निरंजन शहा, मनोज शहा, नितांत चव्हाण, हरिश भुजबळ, अंकुश खोत, पोपट धायगुडे, राजेंद्र कोरडे, डॉ. माधुरी राऊत, ज्योती लडकत, पतसंस्थेचे सर्व संचालक, राहुल ढोले व्यवस्थापक, कर्मचारी, दैनिक बचत प्रतिनिधी, शाखेचे निरा, बारामती, हडपसर, सासवड पतसंस्थेचे सभासद, ग्राहक व बाकी आलेले सर्व पै पाहुणे यावेळी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक दिलीप( दादा) फरांदे संस्थापक अध्यक्ष यांनी केले, सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप यांनी केले, तर आभार उत्तमराव आगवणे व्हॉइस चेअरमन यांनी मानले.

Banco News
www.banco.news