छ. राजर्षी शाहू मल्टिस्टेट लातूर येथे विविध पदांसाठी भरती जाहीर

१० वी पास ते उच्चशिक्षित उमेदवारांना संधी; २८ सप्टेंबरला थेट मुलाखतीचे आयोजन.
Rajarshee Shahu Multistate Co Operative Bank Jobs
राजर्षी शाहू मल्टिस्टेट लातूर भरती २०२६: थेट मुलाखत आणि ई-मेलद्वारे अर्ज सुरू!
Published on

लातूर : लातूर येथील अग्रगण्य 'छ. राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.' मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बँक आणि फायनान्स क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

संस्थेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, क्लार्क, पिग्मी एजंट आणि शिपाई कम ड्रायव्हर अशा विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या ई-मेलवर बायोडाटा पाठवावा किंवा सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.

पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता:

  • १. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) - १ पद (लातूर)

    • पात्रता: B.Com. / M.Com. / M.B.A. / G.D.C. & A.

    • अनुभव: बँकिंग क्षेत्रातील संबंधित पदाचा किमान ७ वर्षांचा अनुभव व संगणक ज्ञान आवश्यक.

  • २. सरव्यवस्थापक (कर्ज व वसुली) - १ पद (लातूर)

    • पात्रता: B.Com. / M.Com. / M.B.A.

    • अनुभव: बँकिंग क्षेत्रातील संबंधित पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव व संगणक ज्ञान आवश्यक.

  • ३. शाखा व्यवस्थापक (Branch Manager) - ५ पदे

    • ठिकाण: लातूर, कळंब, मुरूड, पुणे, धाराशिव

    • पात्रता: B.Com. / M.Com. / M.B.A.

    • अनुभव: बँकिंग किंवा फायनान्स क्षेत्रातील २ वर्षांचा अनुभव व संगणक ज्ञान.

  • ४. क्लार्क (Clerk) - १० पदे

    • ठिकाण: लातूर, कळंब, मुरूड, पुणे, धाराशिव

    • पात्रता: B.Com. / M.Com.

    • अनुभव: बँकिंग किंवा फायनान्स क्षेत्रातील २ वर्षांचा अनुभव व संगणक ज्ञान.

  • ५. पिग्मी एजंट (Pygmy Agent)

    • ठिकाण: धाराशिव, लातूर तालुका व सर्व गावपातळीवर

    • पात्रता: १२ वी पास (बँकिंग कामकाजाची माहिती असणे आवश्यक).

  • ६. शिपाई कम ड्रायव्हर - १ पद (लातूर मुख्य कार्यालय)

    • पात्रता: १० वी पास (बँकिंग कामाची माहिती आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक).

मुलाखतीची वेळ आणि पत्ता:

  • प्रत्यक्ष मुलाखत तारीख: सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६

  • वेळ: सकाळी ११.०० ते दुपारी ५.०० वाजेपर्यंत

  • मुलाखतीचे ठिकाण: मुख्य कार्यालय - एस. के. टॉवर, खर्डेकर स्टॉप, एसबीआय बँकेजवळ, औसा रोड, लातूर.

  • ई-मेल: crsmultistate@gmail.com

  • संपर्क क्रमांक: ०२३८२-२९५८८८ / ८६६९८५७७७७

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Banco News
www.banco.news