
कोल्हापूर – खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने यावर्षी सभासदांसाठी एक आगळीवेगळी दिवाळी भेट देऊन समाजभान जपले आहे पतसंस्थेने या दिवाळीला गोकुळच्या एक किलो तुपाबरोबर चेतना परिवारातील दिव्यांग मुलांनी दिवाळी साठी बनवलेल्या वस्तूंचे खास ‘दिवाळी किट’, सभासदांना देऊन सभासदाबरोबरच दिव्यांग मुलांचा.आनंद द्विगुणीत केला आहे
या योजनेबद्दल माहिती देताना पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे व चेअरमन मच्छिंद्र नाळे यांनी सांगितले की ,पतसंस्थेच्या माध्यमातून आकर्षक विविध योजना राबवल्या जातात पण यावर्षी पतसंस्थेने आपले वेगळेपण जपत शेंडा पार्क येथील चेतना परिवारातील दिव्यांग मुलांनी बनवलेल्या साबण , उटणे , रंगीबेरंगी पणत्या , सुवासिक तेल , अगरबती व अत्तर या दिवाळी साठीच्या वस्तू विकत घेऊन त्याचे किट बनवून सर्व सभासदांना दिवाळी भेट म्हणून हे गिफ्ट दिले आहे .केवळ दिव्यांग मुलांनी हस्तकौशल्यातून तयार केलेल्या वस्तूंची विक्री व्हावी या उदात हेतूने संस्थेने हे पाऊल उचललेले असून यासाठी चेतना परिवार व आपल्या पतसंस्थेचा लोगो असलेली पिशवीही तयार करून त्यातून ही भेट दिली आहे .व या उपक्रमाद्वारे पतसंस्थेने समाजातील दुर्लक्षित घटकांप्रती आपली आपुलकी अधोरेखित केली आहे.
ते पुढे म्हणाले की ,फक्त आर्थिक व्यवहार न पाहता, सामाजिक जबाबदारी जपणे हे देखील संस्थेचे कर्तव्य आहे. दिव्यांग मुलांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे, या हेतूने यंदाची ही दिवाळी भेट दिली असूनसभासदांनी या चे जोरदार स्वागत केले आहे.
ही योजना यशस्वी होण्यासाठी व्हा. चेअरमन कृष्णात चौगले, मा. सचिव वर्षाराणी वायदंडे, संचालक सर्वस्वी सौ. माधुरी घाटगे,सूर्यकांत बरगे,सर्जेराव नाईक ,शिवाजी सोनाळकर, साताप्पा कासार, वसंत पाटील, राजेश कोंडेकर,महादेव डावरे ,अमित परीट ,रोहिणी यडगे , ,संतोष आयरे, राजेंद्र कोरे व कार्यकारी संचालक सदाशिव साळवी यांच्यासह सल्लागार मंडळ व सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले