प्रयाग मल्टीस्टेटची १३ वी वार्षिक सभा संपन्न, सभासदांना १२% लाभांश!

सुवर्णसमृद्धी' योजनेला मोठा प्रतिसाद; जळकोट येथे वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.
Prayag Multistate Jalkot News - AGM 2026
१३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन ॲड. सचिनभैय्या कदम यांनी मांडला वार्षिक प्रगतीचा भक्कम लेखाजोखा.
Published on: 

जळकोट: धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात आपल्या सेवांचा विस्तार करणाऱ्या 'प्रयाग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. जळकोट'ची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (२७ सप्टेंबर) मानमोडी रस्त्यावरील भीमाशंकर मंगल कार्यालय येथे अत्यंत उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे चेअरमन ॲड. सचिनभैय्या कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सभासदांसाठी १२ टक्के घसघशीत लाभांश जाहीर करण्यात आला.

सभेची सुरुवात आई तुळजाभवानी आणि कै. प्रयागबाई रामचंद्र सोनटक्के यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कदम यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक मांडले.

वार्षिक अहवालाचे वाचन करताना चेअरमन ॲड. सचिनभैय्या कदम यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले की, जळकोट, लातूर आणि नंदगाव अशा तीन शाखांच्या माध्यमातून संस्था कार्यरत असून ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेचे २,५१३ सभासद आहेत. संस्थेची वार्षिक उलाढाल २७.७३ कोटी रुपये झाली आहे.

संस्थेची मुख्य आर्थिक आकडेवारी (अहवाल सालातील):

  • एकूण भागभांडवल: ₹६५,६६,५००

  • ठेवी: ₹१५,३३,६४,५७७

  • कर्जवाटप: ₹१२,३९,५१,८६४

  • एकूण उत्पन्न: ₹२,४६,१२,७४३

  • शुद्ध नफा (सर्व खर्च वजा जात): ₹४५,२८,९८६

  • गुंतवणूक: ₹४,७७,५०,९०३

  • स्वनिधी: ₹४३,१०,८९७

संस्थेने मागील चार वर्षांपासून नफ्याची आणि लाभांश देण्याची परंपरा कायम राखली असून यंदा उच्चांकी १२% लाभांश दिला आहे. संस्थेला 'अ' ऑडिट वर्ग मिळाला असून थकबाकीचे प्रमाण नगण्य आहे.

संस्थेच्या व्याजदराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, संस्था एका वर्षाच्या ठेवीवर १०% व्याज देते. सुरक्षित कर्जासाठी १३% तर विनातारण कर्जासाठी १६% व्याजदर आकारला जातो. संस्थेने सुरू केलेल्या 'सुवर्णसमृद्धी सोने खरेदी कर्ज योजनेला' सभासदांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. उच्चशिक्षित संचालक मंडळ, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शक कारभार आणि कर्मचाऱ्यांचे अद्ययावत प्रशिक्षण या जोरावर संस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला आहे.

विषयांना मंजुरी आणि सत्कारांचा कार्यक्रम

सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कदम यांनी मांडलेल्या सर्व विषयांना एकमुखाने मंजुरी देण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे उत्कृष्ट ठेवीदार व कर्जदारांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

या सभेला जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के, तुळजापूर पंचायत समिती सदस्य भिवाजी इंगोले, कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूरचे माजी सभापती आशिषभैय्या सोनटक्के, जळकोटचे माजी सरपंच गजेंद्र नाना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस महेशबप्पा कदम, तंटामुक्त अध्यक्ष यशवंतभाऊ कदम, व्हा. चेअरमन मनोज कदम, संचालक डॉ. संजय कदम, ताजुद्दीन शेख, श्रीकृष्ण चव्हाण, सौ. वैशाली कदम, लक्ष्मी पाटील, जनरल मॅनेजर दिगंबर जाधव, शाखाधिकारी पांडुरंग साखरे, बालिका राजमाने, एस. जे. शेख, ओंकार कोळी, विशाल माने, ज्योती गंगणे, राजशेखर लोहार, सौ. कलशेट्टी, संजय कलशेट्टी, श्रद्धा स्वामी, वैष्णवी पोद्दार यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी पालमपल्ले यांनी केले, तर आभार प्रदर्शन कलाल सर यांनी मानले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.

Banco News
www.banco.news