पतसंस्थांसाठी MIS प्रणाली अद्ययावत: सन २०२५-२०२६ साठी माहिती भरण्याचे निर्देश

सर्व नागरी, ग्रामीण व पगारदार पतसंस्थांना ऑनलाईन प्रणालीद्वारे दि. ३१/०३/२०२६ अखेरची माहिती भरण्याचे सहकार विभागाचे आवाहन; पॅन, जीएसटी आणि सीबीएस अद्ययावत करणे बंधनकारक.
Maharashtra Patsanstha MIS Portal
पतसंस्थांच्या MIS प्रणालीत माहिती भरण्यास सुरुवात; सहकार विभागाचे कडक निर्देश
Published on: 

राज्यातील सर्व नागरी, ग्रामीण बिगर कृषी आणि पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थांच्या कामकाजाची माहिती एकात्मिक करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. महाराष्ट्र राज्य बिगर कृषि सहकारी पतसंस्था नियामक मंडळ, पुणे यांच्या मार्फत 'मे. कल्प टेक्नॉलॉजीस् प्रा.लि., पुणे' यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या 'Management Information System' (MIS) ऑनलाईन प्रणालीमध्ये सन २०२५-२०२६ (दि. ३१/०३/२०२६ अखेरपर्यंतची माहिती) भरण्याची सुविधा अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.

सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाकडून यासंदर्भात सर्व विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक तसेच तालुका व वॉर्ड पातळीवरील सहाय्यक निबंधकांना सविस्तर निर्देश जारी करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना व अद्यतनाचे मुद्दे:

१. जुन्याच युजर आयडीचा वापर: सन २०२४-२५ मध्ये नोंदणी केलेल्या पतसंस्थांनी सन २०२५-२६ साठी नवीन नोंदणी करण्याची गरज नाही. संस्थांनी त्यांच्या पूर्वीच्या user id व password चा वापर करूनच MIS प्रणालीमध्ये माहिती भरावयाची आहे.

२. प्रणालीत भरावयाची सुधारीत व आवश्यक माहिती:

  • संस्था प्रोफाइल: संस्थेच्या प्रोफाइलमध्ये PAN आणि GST क्रमांक अनिवार्यपणे अपडेट करावा.

  • सर्वसाधारण माहिती:

    • संस्थेचे दैनंदिन कामकाज संगणकीकृत प्रणालीद्वारे होते किंवा नाही (होय / नाही).

    • संस्थेची सीबीएस (CBS) कार्यप्रणाली कार्यान्वित आहे किंवा नाही (होय / नाही).

    • प्रत्येक ठेवीदार सभाсаदासाठी युनिक कस्टमर आयडी कोड (UCIC) ची पूर्तता केली आहे किंवा नाही (होय / नाही).

  • भांडवल माहिती: ठेवींच्या प्रकारामध्ये मुदत, बचत आणि चालू खात्यातील ठेवींची सविस्तर माहिती भरावी. तसेच, एकूण ठेवीदारांची संख्या व ठेव रक्कम यांचा ताळमेळ जुळणे बंधनकारक आहे.

  • अंशदान माहिती: प्रणालीमध्ये संस्थेचे मागील ३ वर्षांचे लेखापरिक्षक दाखले (Audit Certificate) अपलोड करणे आवश्यक आहे.

Maharashtra Patsanstha MIS Portal
MIS प्रणालीद्वारे पतसंस्थांची आर्थिक तपासणी; सहकार आयुक्तांचे कडक आदेश

सहकार अधिकाऱ्यांची तपासणी व जबाबदारी

पतसंस्थांनी ऑनलाईन प्रणालीत भरलेली माहिती त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणच्या तालुका किंवा वॉर्ड अधिकाऱ्यांनी (उपनिबंधक / सहाय्यक निबंधक) काटेकोरपणे तपासणे (Validation) आणि तपासून योग्य तो 'शेरा' नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पतसंस्थेचे कार्यक्षेत्र राज्यभर किंवा कुठेही असले, तरी मुख्यालयाच्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांवरच १००% संस्थांची माहिती बिनचूक भरवून घेण्याची मुख्य जबाबदारी राहणार आहे.

ऑनलाइन प्रणालीत माहिती भरताना काही तांत्रिक अडचण आल्यास पतसंस्थांनी तांत्रिक साहाय्यक क्रमांक ९०२१९००५७७ (श्री. सुभाष खवणे / श्री. रोहित) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहकार विभागाकडून करण्यात आले आहे.

Attachment
PDF
पतसंस्था MIS प्रणालीमध्ये सन २०२५-२०२६ दि.३१-०३-२०२६ अखेर ची माहिती भरणेबाबत.
Preview
Banco News
www.banco.news