

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळीतील उल्लेखनीय व समाजोपयोगी कार्याबद्दल दिला जाणारा ‘दिपस्तंभ पुरस्कार’ यंदा मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्थेला प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार फेडरेशनचे अध्यक्ष श्री. काका कोयटे व सहकारमंत्री मा.बाबासाहेब पाटील यांचे बंधू श्री. मंचकराव पाटील यांच्या हस्ते संस्थेला प्रदान करण्यात आला.
संस्थेच्या वतीने हा सन्मान अध्यक्ष श्री. जेवळे दयानंद विश्वनाथ, उपाध्यक्ष श्री.जगताप भास्कर, सचिव श्री. धोंडगे दत्तात्रय, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. भोसले ज्योती निखिल व कर्मचारी सौ. निकम कुंदा यांनी स्वीकारला.
२०१४ ते २०२५ या कालावधीत पुणे-सोलापूर विभागातून सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिपस्तंभ द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार “मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्था”ला जाहीर करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात संस्थेला हा सन्मान मिळणे ही केवळ योगायोगाची बाब नसून, संस्थेने केलेल्या आर्थिक व सामाजिक कार्याची दखल आहे. हा पुरस्कार म्हणजे संस्थेतील पदाधिकारी, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांच्या मेहनतीचे फलित असून, ठेवीदार, भागधारक व खातेदार यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे, अशी भावना संस्थेचे अध्यक्ष श्री. जेवळे दयानंद विश्वनाथ यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.