मांजरा महिला अर्बन क्रेडिट सोसायटीचे रक्तदान शिबीर संपन्न

लातूरमध्ये रक्तदान शिबीरास ५० दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान; अध्यक्षा प्रियंका सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम यशस्वी
Manjara Mahila Urban Credit Society
मांजरा महिला क्रेडिट सोसायटीचा स्तुत्य उपक्रम: ५० दात्यांनी केले रक्तदान
Published on

लातूर: सहकार क्षेत्रातील अग्रेसर संस्था म्हणून ओळख असलेल्या मांजरा महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, लातूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास नागरिकांचा व रक्तदात्यांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात एकूण ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

सदर रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजन संस्थेच्या अध्यक्षा सौ. प्रियंका सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी वृंदाने शिबीराचे नियोजनबद्ध आयोजन केले.

याप्रसंगी बोलताना संस्थेच्या व्यवस्थापनाने सांगितले की,

"मांजरा महिला अर्बन क्रेडिट सोसायटी ही केवळ आर्थिक व्यवहारांपुरती मर्यादित न राहता समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व जनहितासाठी कटिबद्ध आहे. संस्थेच्या वतीने सामाजिक, आर्थिक व जनहिताच्या विविध उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येत असून, समाजाच्या विकासासाठी संस्था नेहमीच अग्रेसर राहील."

या शिबीरामध्ये स्थानिक नागरिक, युवा वर्ग तसेच संस्थेच्या सभासदांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून सामाजिक जाणीव जपली. सहकार क्षेत्रातील वित्तीय संस्थांनी अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेतल्याबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.

Banco News
www.banco.news