माळवाडीत क्रांती अर्बन क्रेडिट सोसायटीच्या नवीन शाखेचे दिमाखात उद्घाटन

मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला - संचालक, सल्लागार व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
Kranti Urban Co-Op. Credit Society Ltd. Palus
माळवाडी क्रांती अर्बन क्रेडिट सोसायटी
Published on

भिलवडी : माळवाडी परिसरातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने क्रांती अर्बन क्रेडिट सोसायटीच्या नवीन शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या शाखेचे उद्घाटन पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण (अण्णा) लाड यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार अरुण (अण्णा) लाड म्हणाले की, “सहकार क्षेत्रात क्रांती अर्बन संस्थेने सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी मोलाचे कार्य केले आहे. पारदर्शक कारभार आणि विश्वासार्ह सेवा यामुळे संस्था नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. माळवाडी येथे सुरू झालेल्या या नवीन शाखेमुळे परिसरातील शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग व्यवहारासाठी मोठी सोय होणार आहे.”

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष धन्यकुमार पाटील, उपाध्यक्ष प्रथमेश दिवटे, सल्लागार ॲड. सतीश चौगुले, मुख्य कार्यकारी अधिकारी सागर रेपाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संचालक दिलीप जाधव, सुरेश शिंदे, सुरेश देशमुख, जनार्दन पाटील, पंकज पाटील, घनश्याम पोळ, शिवाजी केसरे, वसंत पाटील, प्रमोद माने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शाखा सल्लागार समितीचे राजेंद्र चौगुले, उदय साळुंखे, निखिल पाटील, तानाजी मोकाशी, विनोद पाणबुडे, विशाल शिंदे यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमास शोभा वाढवली.

कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर, चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे, क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील, तसेच सुभाष वडेर, संजय पवार, शीतल बिरनाळे, उमेश जोशी, महेश पाटील, मोहन पाटील, महावीर चौगुले, सतीश चौगुले, दिलीप मोकाशी, नितीन नवले यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन शाखेमुळे माळवाडी व परिसरातील नागरिकांना बचत खाते, कर्ज सुविधा, ठेवी योजना आणि इतर आर्थिक सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

Banco News
www.banco.news