
कोल्हापूर येथील "खासगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेने सुरु केलेली मोबाईल बँकिंगची सुविधा आदर्शवत असून सभासदांना ती लाभदायक ठरेल," असे मत जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे अधीक्षक उदय सरनाईक यांनी व्यक्त केले. खासगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या मोबाईल बँकिंग ॲपच्या अनावरणाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे होते. सभासदांच्या सहकार्यामुळेच या पतसंस्थेचा वटवृक्ष झाल्याचे श्री. रसाळे म्हणाले. पतसंस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र नाळे यांनी संस्थेला तीन कोटींहून अधिक नफा झाल्याचे सांगितले. यावेळी नेटवीन सिस्टीमचे महेश पाटील यांनी मोबाईल बँकिंगची माहिती दिली. संचालक महादेव डावरे यांनी स्वागत केले.
यावेळी संचालक वर्षाराणी वायदंडे, राजेंद्र कोरे, संतोष आयरे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक शिवाजी सोनाळकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी माजी संचालक शिवाजी भोसले, राजेश कोंडेकर, साताप्पा कासार, सूर्यकांत बरगे, सर्जेराव नाईक, रोहिणी येडगे, समिती सदस्य पंडित मस्कर, अमित परीट, वसंत पाटील, सल्लागार कांबळे, आप्पासाहेब वागरे, चंद्रकांत दशरथ वाकरेकर, व्यवस्थापक सदाशिव साळवी उपस्थित होते. उपाध्यक्ष कृष्णात चौगले यांनी आभार मानले.