अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 'जीवनज्योती पतसंस्थेच्या' शाखेचे दिमाखात उद्घाटन

प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता हेच आमचे भांडवल - संस्थापक चेअरमन संतोष जाधव; विट्यात पहिली शाखा कार्यान्वित
जीवनज्योती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था
बँकिंग क्षेत्रात 'जीवनज्योती'चे मोठे पाऊल; खानापूरच्या बलवडीनंतर आता विटा शहरातही सेवा सुरू!
Published on

विटा: सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बलवडी (भा.) येथून दहा वर्षांपूर्वी आपला प्रवास सुरू करणाऱ्या जीवनज्योती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने आता तालुका पातळीवर विस्तार केला आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर विटा शहरात संस्थेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन अत्यंत उत्साहात संपन्न झाले.

मान्यवरांची उपस्थिती आणि कौतुक

या शाखेचे उद्घाटन सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. बाबासाहेब मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मुळीक यांनी जीवनज्योती पतसंस्थेच्या गेल्या १० वर्षांतील पारदर्शक आणि प्रगतीशील वाटचालीचे विशेष कौतुक केले. विटा शहरात ही शाखा नक्कीच ग्राहकांचा विश्वास संपादन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:

  • किसन भाऊ जानकर (माजी समाजकल्याण सभापती, सांगली जि.प.)

  • संग्राम देशमुख (मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, रयत शिक्षण संस्था)

  • सुशांतभाऊ देवकर (आदर्श सरपंच)

  • संजय काका सपकाळ (माजी उपनगराध्यक्ष, विटा नगरपरिषद)

  • अजित जाधव, महेश कुपाडे,नितीन सुर्वे, शिवराज घोरपडे, संतोष गायकवाड, पृथ्वीराज पाटील, महेश फडतरे(युवा नेते)

  • ॲड. दिलीप हिंगसे, ॲड. सौ. मार्ले यांसह विटा परिसरातील अनेक उद्योजक उपस्थित होते.

  • प्रमोद पवार (उपसरपंच)

  • मारुती पवार (माजी सरपंच)

संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. संतोष जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत करून संस्थेच्या १० वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला. ते म्हणाले,

"बलवडी सारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेली ही संस्था आज कार्यक्षेत्र वाढीमुळे विटा शहरात पोहोचली आहे. विटा शहरात वित्तीय सेवा देताना आम्ही प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता या गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य देऊ."

हा उद्घाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे व्हा. चेअरमन संदीप पवार, संचालक अशोक पवार, अभिजीत पवार, दशरथ पवार आणि कुसुम सावंत यांनी नियोजन केले. तसेच व्यवस्थापक अमोल पवार, प्राजक्ता जाधव, सुशांत कोकाटे, प्रशांत सूर्यवंशी आणि दिपाली पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

या नवीन शाखेमुळे विटा परिसरातील व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध होणार असून, परिसरातून संस्थेचे अभिनंदन होत आहे.

Banco News
www.banco.news