जिल्हा नागरी बँक सेवक पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात

सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर
जिल्हा नागरी बँक सेवक सहकारी पतसंस्था
जिल्हा नागरी बँक सेवक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अमोल मुदगल. शेजारी सयाजी जाधव, राहुल शिंदे आदी.
Published on

कोल्हापूर येथील कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सेवक सहकारी पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शाहूपुरीतील वसंतराव चौगुले पतसंस्थेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच संपन्न झाली.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अमोल मुदगल होते. सभेत सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याचा निर्णय झाला. यावेळी श्री. मुदगल यांनी संस्थेचा कारभार पारदर्शकअसून सभासदांच्या हितासाठी संस्था कटिबद्ध आहे. येत्या काळातही विविध सभासदाभिमुख योजना राबवणार असल्याचे सांगितले.

सभेत दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष सयाजी जाधव, राहुल शिंदे, उत्तम पाटील, नंदकुमार दबडे, संजय देसाई, कृष्णात पाटील, संतोष काळे, अनिलकुमार रेंदाळे, दीपक माळी, मनोजकुमार शिंदे, सुभाष बागडे, रुपाली सावंत, अस्मिता पाटील उपस्थित होते. संस्थेचे व्यवस्थापक संभाजी गौड यांनी अहवाल वाचन केले. यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक दत्तात्रय पाटील यांनी आभार मानले.

Banco News
www.banco.news