

भरतीचा सविस्तर तपशील:
शाखाधिकारी (Branch Manager)
एकूण पदे: ३
शैक्षणिक पात्रता व अनुभव: उच्च पदवीधर असणे आवश्यक असून, बँकिंग किंवा पतसंस्था क्षेत्रात किमान ४ ते ५ वर्षांचा अनुभव असणे अनिवार्य आहे.
नियुक्तीचे ठिकाण: जत, विटा आणि जयसिंगपूर शाखा.
गोल्ड लोन ऑफिसर (Gold Loan Officer)
एकूण पदे: ८
शैक्षणिक पात्रता व अनुभव: किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, सुवर्णकर्ज (Gold Loan) क्षेत्रात काम करण्याचा किमान २ ते ३ वर्षांचा अनुभव असावा.
नियुक्तीचे ठिकाण: ईश्वरपूर, जयसिंगपूर, विटा, इचलकरंजी, तासगाव, सांगली, जत आणि आटपाडी शाखा.
मुलाखतीची वेळ व ठिकाण:
दिनांक: सोमवार, ०७ सप्टेंबर २०२६
वेळ: सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत
ठिकाण: हडको कॉलनी, चिन्मय पार्क रोड, लक्ष्मी मंदिराजवळ, सांगली.
उमेदवारांसाठी सूचना:
इच्छुक उमेदवारांनी आपल्या सर्व मूळ कागदपत्रांसह (Original Documents), बायोडाटा आणि छायाचित्रासह दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी ९८०१२४२७२७, ८४२१२१६९२३ किंवा ८४२१२१६१२३ या मोबाईल क्रमांकावर किंवा fabtechmulti@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.