फॅबटेक मल्टीस्टेटमध्ये विविध पदांसाठी 'वॉक-इन-इंटरव्ह्यू'

पदवीधरांसाठी बारामतीत थेट मुलाखत; पाहा पात्रता, वेळ आणि संपर्क क्रमांक.
Fabtech Multistate Baramati Recruitment 2026
Job Alert: बारामतीत फैबटेक मल्टीस्टेट बँकेत विविध पदांवर भरती!
Published on: 

बारामती / सांगोला: बँकिंग क्षेत्रात ४० हून अधिक शाखांच्या जाळ्याद्वारे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 'फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., सांगोला' या संस्थेच्या नव्या बारामती शाखेसाठी विविध पदांवर भरती प्रक्रियेची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीसाठी गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी बारामती येथे थेट मुलाखतीचे (Walk-in-Interview) आयोजन करण्यात आले आहे.

बँकिंग व फायनान्स क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या अनुभवी तसेच नवख्या (Freshers) उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

१. ब्राँच मॅनेजर (बारामती / इंदापूर) - २ पदे

  • शैक्षणिक पात्रता: MBA / M.Com / B.Com

  • अनुभव: फायनान्स किंवा बँकिंग क्षेत्रातील ४ ते ५ वर्षांचा अनुभव.

२. गोल्ड लोन मॅनेजर / ऑफिसर - ४ पदे

  • शैक्षणिक पात्रता: B.Com किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर

  • अनुभव: फायनान्स/बँकिंग क्षेत्रातील २ ते ३ वर्षांचा अनुभव.

३. सेल्स ऑफिसर / सेल्स मॅनेजर (डिपॉझिट / CASA) - ४ पदे

  • शैक्षणिक पात्रता: B.Com किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर

  • अनुभव: मल्टीस्टेट, पतसंस्था किंवा बँकिंग क्षेत्रातील अनुभव असलेल्यांना प्राधान्य.

४. क्लार्क / पासिंग ऑफिसर / कॅशिअर - ४ पदे

  • शैक्षणिक पात्रता: B.Com किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर

  • अनुभव: फ्रेशर्स (नवीन उमेदवार) तसेच अनुभवी उमेदवारांना संधी.

मुलाखतीची वेळ आणि पत्ता:

  • दिनांक: गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६

  • वेळ: सकाळी ठीक १०:०० वाजता

  • स्थळ: स्पंदन बिल्डींग, ग्राउंड फ्लोअर, कराड बँकेच्या खाली, सम्यक क्लॉथ शॉपच्या बाजूस, रेल्वे उड्डाण पुलाजवळ, भिगवण रोड, बारामती, जि. पुणे (पिं. ४१३१०२).

अधिक माहिती आणि संपर्कासाठी:

इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस येताना आपले अपडेटेड रेझ्युमे (CV) व सर्व आवश्यक मूळ शैक्षणिक व अनुभवाची कागदपत्रे सोबत आणावीत.

  • HR (मनोज सर): ९८०१२४२७२७

  • Area Manager (विनायक सर): ८४११९७४८०४

  • ई-मेल: fabtechmulti@gmail.com

Banco News
www.banco.news