
देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जालना या पतसंस्थेत खालील प्रमाणे रिक्त पदांची भरती करावयाची आहे.
पदाचे नाव :- मार्केटिंग /वसुली कर्मचारी
पदांची संख्या :- २५
पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) अनिवार्य.
संगणकीय ज्ञान, Tally, DTP, मराठी व इंग्रजी टाईपिंग आवश्यक.
सहकारी पतसंस्था, बँकिंग किंवा आर्थिक क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य,
नोकरीचे कार्यस्थळ:- जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १८ शाखांमध्ये
अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख :- ०६ ऑक्टोबर २०२५ (सोमवार)
अर्ज पाठवण्याची पध्दत :-
अर्ज मुख्य कार्यालयात अथवा संस्थेच्या कोणत्याही शाखेत प्रत्यक्ष किंवा पोस्टाने ५०/-रु. शुल्कासह पाठवावा. अर्ज संस्थेच्या सर्व शाखांमध्ये मिळेल अथवा संस्थेची वेबसाईट devgiripatsansthajalna.com वरुन डाऊनलोड करुन अर्ज ५०/- रुपये शुल्कासह संस्थेत जमा करावा.
निवड प्रक्रिया :- १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेचे ठिकाण व दिनांक आपल्या मोबाईल नंबरवरील Whatsapp वर कळविण्यात येईल.
महत्त्वाची सूचना :- उमेदवाराला संस्थेच्या कोणत्याही शाखेत काम करावे लागेल. भरती ही कंत्राटी पध्दतीने असेल. सदर पदासाठी योग्य मानधन दिले जाईल व अतिरिक्त कामासाठी योग्य मोबादला दिला जाईल. दुचाकी वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक.
सदर पदासाठी १ वर्षांचा कालावधी राहील. सदर कालावधीत काम समाधानकारक असल्यास संस्थेच्या क्लार्क / कॅशिअर या पदी नियुक्ती देण्याचा अधिकार अध्यक्ष व संचालक मंडळाला राहील. सर्व अधिकार अध्यक्ष / संचालक मंडळाच्या अधीन राहतील.
मुख्य कार्यालयाचा पत्ता :-
देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जालना टाऊन हॉल जवळ, कचेरी रोड, जुना जालना ४३१ २०३ संपर्क ९११२२१४०९९
स्वाक्षरी /-
अध्यक्ष देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जालना.