वित्त विधेयक २०२६: सहकारी संस्थांसाठी कर दरात बदल नाही

उत्पन्न कर दर आणि अधिभारात कोणताही बदल नाही
सहकारी संस्थांसाठी कर दरात बदल नाही
वित्त विधेयक २०२६
Published on

वित्त विधेयक २०२६ मध्ये स्पष्ट केले आहे की, कर निर्धारण वर्ष २०२६-२७ आणि कर वर्ष २०२६-२७ साठी सहकारी संस्थांवर लागू होणारी विद्यमान उत्पन्न कर रचना अपरिवर्तित राहणार आहे. पहिल्या अनुसूचीच्या भाग 1A आणि भाग IB मधील परिच्छेद B नुसार, सहकारी संस्थांवर वेगळ्या कर प्रणाली अंतर्गत कर आकारला जाईल.

सहकारी संस्थांसाठी कर दरात बदल नाही
वित्त विधेयक २०२५ : सामाजिक, धार्मिक संस्थांबाबत शंका..?

सहकारी संस्थांसाठी उत्पन्न कर स्लॅब

  • ₹10,000 पर्यंत उत्पन्न: १०% कर

  • ₹10,001 ते ₹20,000 पर्यंत उत्पन्न: २०% कर

  • ₹20,000 पेक्षा अधिक उत्पन्न: ३०% कर

सहकारी संस्थांवर लागू असलेली अधिभार रचना देखील अपरिवर्तित राहणार आहे:

  • एकूण उत्पन्न ₹1 कोटी पेक्षा जास्त पण ₹10 कोटीपेक्षा जास्त नसल्यास: ७% अधिभार

  • एकूण उत्पन्न ₹10 कोटी पेक्षा जास्त असल्यास: १२% अधिभार

  • अधिभार प्रकरणातील किरकोळ सवलतीत बदल नाही.

सवलतीच्या कराचा पर्याय

निवासी सहकारी संस्था, आयकर कायदा, २०२५ च्या कलम २०३ अंतर्गत, अटी पूर्ण केल्यास २२% सवलतीचा कर दर निवडू शकतात. या प्रकारच्या करावर १०% अधिभार लागू होईल.

सहकारी संस्थांसाठी कर दरात बदल नाही
"आयकर विधेयक २०२५ "मध्ये " सहकारा"साठी मोठे कर लाभ

आरोग्य आणि शिक्षण उपकर

२०२६-२७ या कर वर्षासाठी सहकारी संस्थांवर आयकरासह ४% आरोग्य आणि शिक्षण उपकर लागू राहणार आहे. उपकरावर कोणतीही किरकोळ सवलत उपलब्ध नाही.

मुख्य मुद्दा:- वित्त विधेयक २०२६ मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की सहकारी संस्थांसाठी कर दर किंवा अधिभारात कोणताही बदल प्रस्तावित नाही, आणि विद्यमान चौकट मागील आर्थिक वर्षाप्रमाणेच चालू राहील.
Banco News
www.banco.news