
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या छत्रपती राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.लातूर संस्थेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सभासदांना ५ टक्के लाभांश जाहीर केला असून तो सभासदांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
दिनांक ११ सप्टेंबर रोजी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष अनिल माने यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे संस्थापक विजयकुमार शेळके यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेत सभासदांसमोर सविस्तर अहवाल मांडला.
संस्थेने सहकार खात्याने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून नेट एनपीए शून्य टक्के राखण्यात यश मिळवले आहे. तसेच यावर्षी संस्थेला ‘अ’ श्रेणीचा ऑडिट वर्ग प्राप्त झाला असल्याची माहिती देण्यात आली.
सभेत सभासदांनी विविध प्रश्न उपस्थित केले असता व्यवस्थापनाकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आली. संस्थेच्या कामकाजावर सभासदांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी संचालक मोहन जाधव यांनी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायट्यांवरील पाच पुस्तकांबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संचालक अमर सोट यांनी केले.