

सन २०२६ मध्ये सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या दैनंदिन कामकाजाला अधिक वेग, अचूकता आणि सोय मिळणार असून यामध्ये ‘बँको पतसंस्था डायरी २०२६’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. गेल्या तब्बल २७ वर्षांपासून बँका व पतसंस्थांचा विश्वासू साथीदार म्हणून ओळख असलेल्या बँको संस्थेकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही ही विशेष डायरी प्रकाशित करण्यात येत आहे.
पतसंस्था लहान असो वा मोठी, प्रत्येक शाखेतील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या हातात उपयुक्त ठरणारी ही डायरी यंदा अधिक नवीन माहिती, अद्ययावत कायदे आणि संदर्भांसह सादर केली जाणार आहे. त्यामुळे २०२६ मध्ये पतसंस्थांचे कामकाज अधिक सुलभ, नियोजनबद्ध आणि नियमबद्ध होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
‘बँको पतसंस्था डायरी २०२६’ ही केवळ नोंदीसाठीची साधी डायरी नसून, ती ४०० हून अधिक पानांचा परिपूर्ण संदर्भग्रंथ आहे. या डायरीत तब्बल २७२ पानांमध्ये कायद्यांचा अचूक आणि सविस्तर संदर्भ देण्यात आला आहे.
यामध्ये प्रामुख्याने –
महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६०
सहकारी संस्था निवडणूक सुधारणा कायदा २०२१
बहुराज्यीय सहकारी संस्था सुधारणा कायदा २०२३
यांचे सुलभ, मुद्देसूद आणि व्यवहारात उपयुक्त असे स्पष्टीकरण समाविष्ट करण्यात आले आहे.
या डायरीमध्ये कर्जवसुलीचे नियम, लेखापरीक्षण प्रक्रिया, आदर्श उपविधी, ठेवींसंबंधीचे परिपत्रके, नामांकन प्रक्रिया तसेच सुधारित मुद्रांक शुल्क यांसारख्या तांत्रिक आणि महत्त्वाच्या बाबींचा सखोल अभ्यास एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी परिपत्रके वेगवेगळ्या ठिकाणी शोधण्यात होणारा वेळ वाचणार आहे.
कायद्यांच्या संदर्भासोबतच या पुस्तकात १६० पानांचा स्वतंत्र डायरी विभाग देण्यात आला असून, तो पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या रोजच्या नोंदी, नियोजन आणि कामाच्या नोंदवहीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
बँको पतसंस्था डायरी २०२६ ही पतसंस्थांच्या संपूर्ण कामकाजाची ‘मास्टर की’ असल्याचे मत अनेक सहकारी क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. वेळेची बचत, कामातील अचूकता आणि नियमांचे पालन या तिन्ही बाबींमध्ये ही डायरी महत्त्वाची मदत करणार आहे.
वर्षभर वेळ वाचवणाऱ्या या उपयुक्त डायरीसाठी बँकोकडून आजच संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या कामाला सुरुवात करण्याआधी ‘बँको पतसंस्था डायरी २०२६’ प्रत्येक पतसंस्थेच्या टेबलवर असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. अत्यंत माफक दरात उपलब्ध असलेली ही डायरी ही तुमच्या कामातील सर्वोत्तम गुंतवणूक ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा : ९१६८६५८४८४
पत्ता: मधुसूदन रेसिडन्सी, महालक्ष्मी नगर, गोखले कॉलेज जवळ,मंगळवार पेठ, कोल्हापूर – ४१६०१२ (महाराष्ट्र).