आरंभ महिला नागरी सहकारी पतसंस्थेत विविध पदांची भरती

पात्रता, अनुभव आणि मुलाखतीचे स्थळ; एका क्लिकवर वाचा सविस्तर माहिती.
aarambh mahila nagari sahakari pat sanstha nagpur recruitment 2026
व्यवस्थापक, लिपीक आणि ठेव प्रतिनिधींसह १६ जागांसाठी भरती; १३ सप्टेंबरला Walk-in-Interview.
Published on

नागपूर: नागपूर येथील ‘आरंभ महिला नागरी सहकारी पत संस्था (मर्या.)’ यांच्या वतीने विविध ५ वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. व्यवस्थापक, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर्स (B.D.O.), लिपीक, शिपाई आणि दैनिक ठेव प्रतिनिधी या पदांसाठी पात्र व इच्छुकांसाठी थेट मुलाखतीचे (Walk-in-Interview) आयोजन करण्यात आले आहे.

पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता:

१. व्यवस्थापक (Manager) - १ पद

  • शैक्षणिक पात्रता: M.Com., B.Com., MS-CIT.

  • अनुभव: सहकारी संस्थेमध्ये कामाचा कमीत कमी ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.

२. बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर्स (B.D.O.) - १ पद

  • शैक्षणिक पात्रता: B.Com., MS-CIT.

  • अनुभव: सहकारी संस्थेमध्ये कामाचा कमीत कमी ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.

३. लिपीक (Clerk) - २ पदे

  • शैक्षणिक पात्रता: B.Com., MS-CIT.

  • अनुभव: सहकारी संस्थेमध्ये कामाचा कमीत कमी ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.

४. शिपाई (Peon) - १ पद

  • शैक्षणिक पात्रता: १२ वी पास.

५. दैनिक ठेव प्रतिनिधी (Daily Pigmy Collector) - १० पदे

  • शैक्षणिक पात्रता: १२ वी पास.

aarambh mahila nagari sahakari pat sanstha nagpur recruitment 2026
आरंभ महिला सहकारी पतसंस्था नागपूरची वार्षिक सभा उत्साहात

मुलाखतीचा तपशील:

  • मुलाखतीची तारीख: रविवार, १३ सप्टेंबर २०२६

  • वेळ: सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत

  • स्थळ: आरंभ महिला नागरी सहकारी पत संस्था (मर्या.), प्लॉट नं. २७, संजय गांधी नगर, पीपळा रोड, हुडकेश्वर, नागपूर - ४४००३४

महत्वाच्या सूचना:

पात्र व इच्छुक उमेदवारांनी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रांसह (Original Documents) व आवश्यक छायाप्रतींसह दिलेल्या पत्त्यावर स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

  • संपर्क क्रमांक: ९३५९४०५२४२ / ८७६७९९९५९३

  • ई-मेल: aarambhmahila2021@gmail.com

Banco News
www.banco.news