

पिंपरी-चिंचवड:
पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात अग्रगण्य आणि वेगाने विस्तार करणाऱ्या इंद्रायणी को-ऑपरेटिव्ह बँक लि. पिंपरी यांच्याकडून विविध महत्त्वाच्या पदांसाठी अनुभवी आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
बँकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, खालील पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे:
मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer): १ पद
सहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager): २ पदे
क्रेडिट मॅनेजर (Credit Manager): १ पद
ऑडिट मॅनेजर (Audit Manager): १ पद
एचआर मॅनेजर (HR Manager): १ पद
मार्केटिंग मॅनेजर (Marketing Manager): १ पद
आयटी असिस्टंट - पेमेंट चॅनेल (IT Asst. - Payment Channel): १ पद
बोर्ड प्रोसिडिंग्स अँड डॉक्युमेंटेशन असिस्टंट: १ पद
ब्रांच मॅनेजर (Branch Manager): ५ पदे
अर्जाची मुदत: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्जाचा पत्ता: इच्छुक उमेदवार आपला अर्ज थेट बँकेच्या मुख्य कार्यालयात (प्लॉट नं. १०९ बी, सी.टी.एस. नं. १४८०, साधू वासवानी गार्डन जवळ, जामताणी चौक, पिंपरी, पुणे - ४११ ०१७) जमा करू शकतात.
ई-मेलद्वारे अर्ज: उमेदवार hr@indrayani.bank.in या ई-मेलवर अर्ज पाठवू शकतात आणि त्याची एक प्रत agm@indrayani.bank.in वर सीसी (CC) करावी.
उच्च शैक्षणिक पात्रता आणि बँकिंग क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
अधिक माहिती किंवा संपर्कासाठी: दुपारी १२.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत ८९५६०२५६४३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
बँकेची अधिकृत वेबसाईट: www.indrayani.bank.in
श्री. विशाल लढा, महाव्यवस्थापक, इंद्रायणी को-ऑप. बँक लि. पिंपरी