
विदर्भ-मराठवाड्यात अग्रगण्य असलेल्या दि यवतमाळ अर्बन को-ऑप बँकेच्या वतीने मुख्य कार्यालय गार्डन रोड एलआयसी चौक यवतमाळ येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले व भारतमातेला मानवंदना देण्यात आली.
त्यानंतर सकाळी ८.०० वा. बँकेच्या मुख्य कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १० वी व १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सत्कार व कौतुक सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीनजी खर्चे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर कोहरे, संचालक प्रमोद धुर्वे, श्रीमती मिराताई घाटे, परिमल देशपांडे, महेश सारोळकर, तज्ञ संचालक नरेंद्र देशपांडे, अरविंद पांढारकर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. ३० यशस्वी विद्यार्थ्याना भेटवस्तु तसेच त्यांच्या पालकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना डॉ. नितीनजी खर्चे यांनी शुध्द पर्यावरण, नागरिक कर्तव्य, प्रामाणिकपणे कर भरणे, पंचपरीवर्तण, स्वदेशी, कुटूंब प्रबोधन, सामाजिक प्रबोधन बाबत विवेचन केले.
या वेळी बँकेचे सर्व संचालक, सर्व सहा.सरव्यवस्थापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशांक गौतमे यांनी केले. तर प्रास्ताविक मिलिंद देशपांडे यांनी केले. आभार प्रदर्शन राजेश तुरकर यांनी केले. संतोष भोयर यांनी सामूहिक वंदेमातरम गीत म्हटल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.