
पश्चिम बंगाल राज्य सहकारी बँक लिमिटेड (WBSCB) ने आर्थिक वर्ष- २०२४-२५ मध्ये प्रभावी आर्थिक कामगिरी करत २२४.१४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवलेला आहे. मागील वर्षाच्या १८६.८२ कोटी रुपयांच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय असून, सलग दुसऱ्या वर्षी बँकेने 'ऑडिट वर्ग अ ' मिळवलेला आहे.
३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेचा मुख्य व्यवसायातून मिळवलेला नफा ३६८.९८ कोटी रुपये झाला. मजबूत कर्ज धोरण, विवेकी मालमत्ता व्यवस्थापन आणि वाढीव कार्यक्षमतेमुळे हा यशाचा टप्पा रचला गेला आहे. बँकेने १,९५०.९८ कोटी रुपयांचे व्याज उत्पन्न मिळवले तर निव्वळ व्याज उत्पन्न ४७५.७५ कोटी रुपये आहे.
बँकेच्या ठेवी १,५५५१.६९ कोटी रुपये, कर्ज १४,११५.१६ कोटी रुपये आणि कर्जवाटप ११,६५९.९२कोटी रुपये इतके झाले. गुंतवणूक पोर्टफोलिओ ७,३०१.७९ कोटी रुपये राहिला. निव्वळ एनपीए ०.८५% वरून०.८०% पर्यंत घटला आणि एकूण एनपीए ४.६९% वर आलेला आहे.
भांडवल ते जोखीम-भारित मालमत्ता गुणोत्तर (CRAR) २७% इतके मजबूत असून, बँकेची निव्वळ संपत्ती १,२०५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सातत्याने होत असलेल्या नफ्यामुळे पश्चिम बंगाल राज्य सहकारी बँक (WBSCB) देशातील आघाडीच्या सहकारी बँकांपैकी एक म्हणून आपली ओळख अधिक मजबूत करत आहे.