
विदर्भ विभाग कार्यक्षेत्र व रु. ८५० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय असलेल्या वर्धा नागरी सहकारी अधिकोष (बँक) मर्यादित, वर्धा मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) पदावर नेमणूक करावयाची असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
शैक्षणिक पात्रता:
M.Com / CAIIB / डिप्लोमा इन को-ऑपरेशन अँड मॅनेजमेंट किंवा आर.बी.आय.च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठरविलेल्या ‘फिट अँड प्रॉपर पात्रतेला" अनुसरून पात्रता असलेले.
अनुभव:
बँकिंग क्षेत्रातील किमान ८ (आठ) वर्षे मध्यम / वरिष्ठ व्यवस्थापक पदाचा अनुभव असावा.
वय:
अर्जाच्या दिनांकापर्यंत वय ५० वर्षांपेक्षा जास्त असावे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी "मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी अर्ज" असा उल्लेख करून आपले अर्ज बँकेच्या अध्यक्षांकडे खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेलद्वारे पाठवावेत. अर्जासोबत स्वयंप्रमाणित कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचा फोटो लावलेला बायोडाटा जोडावा.
बायोडाटामध्ये सध्याचे व आधीचे नोकरीविषयक तपशील, पदनाम, सध्याचे मानधन, पत्रव्यवहाराचा पत्ता, ई-मेल, मोबाईल व लँडलाईन क्रमांक नमूद करावा.
आपला अर्ज कार्यालयात दिनांक १६/१०/२०२५ पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
अध्यक्ष
वर्धा नगरी सहकारी अधिकोष (बँक) म.नं., वर्धा
मुख्य कार्यालय : "माधव भवन", देवी अष्टभुजा मंदिर चौक, धंतोली, वर्धा – ४४२ ००१.
फोन : 07152-240643, मोबाईल : 8956232800
ई-मेल : wns_bank@rediffmail.com