

कार्यक्रमाची सुरुवात बँकेचे संचालक रमेश ओसवाल आणि सुशीला ओसवाल यांच्या हस्ते झालेल्या श्री सत्यनारायण महापूजेने झाली. त्यानंतर बँकेचे अध्यक्ष अनिल देव, पालक अधिकारी जनार्दन शिंदे, उपाध्यक्ष डॉ. शेखर कांबळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) चंद्रशेखर काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपप्रज्वलन करून मुख्य सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी माजी अध्यक्ष अरुण देव, डॉ. सुधीर बोधे, उपसरव्यवस्थापक आनंद पटवर्धन, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अविनाश जोशी, रामचंद्र कानडे यांच्यासह संचालक मंडळातील विवेक पटवर्धन, माधव कान्हेरे, अॅड. बाळकृष्ण पंडित, महेश राजेमहाडीक, मकरंद मुळ्ये, काशीनाथ शेलार, प्रीतम भुतकर, स्वप्नील जाधव, अशोक लोखंडे, चंद्रकांत गुजर, संचालिका अॅड. सुनीती गोवित्रीकर आणि नगरसेविका सौ. ज्योती गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.
वर्धापन दिनाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या रक्तदान शिबिरामध्ये बँकेचे सभासद, हितचिंतक, संचालक, अधिकारी आणि कर्मचारी अशा ५० हून अधिक सुजाण नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तसेच यासह उपस्थित नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा परिसरातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला.
बँकेच्या या १०५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल सदिच्छा देण्यासाठी वाई शहर आणि परिसरातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी बँकेला भेट दिली. यामध्ये प्रामुख्याने नगराध्यक्ष अनिल सावंत, हेमंत येवले, प्रसाद महाडीक, संतोष जमदाडे आणि अॅड. जगदीश पाटणे यांचा समावेश होता.
पत्रकारितेच्या क्षेत्रातून जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, तालुकाध्यक्ष सचिन ननावरे, तसेच पत्रकार भद्रेश भाटे, विकास जाधव आणि अतुल संकपाळ यांनी उपस्थित राहून बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि संचालक मंडळाचा विशेष गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. मधुसूदन मुजुमदार, कांतीलाल जैन, माजी उपाध्यक्ष सुनील शिंदे, माजी संचालक मिलिंद भंडारे, अॅड. प्रतापराव शिंदे, विवेक भोसले, नरहरी महाबळेश्वरकर, सीए राजेंद्र गाडगीळ, सीए प्रविणा ओसवाल, सीए दत्तात्रय खरात, डॉ. शस्मिता सनकी, सौ. सुनिता कट्टे, डॉ. मकरंद पोरे, डॉ. पराग लांबाडे, नाना खोपडे, शशिकांत गोखले, दिलीप जमदाडे, शिवाजी जमदाडे, अविनाश गाढवे, महेंद्र भोसले, उत्तमसिंग राजपूत आणि सौ. मनीषा घैसास यांच्यासह वाई परिसरातील असंख्य ग्राहकांनी आणि हितचिंतकांनी बँकेत येऊन व्यवस्थापनाचे अभिनंदन केले.
१०५ वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या वाई अर्बन बँकेने व्यावसायिक प्रगती साधतानाच अशा सामाजिक उपक्रमांतून जनतेशी असलेले आपले नाते अधिक घट्ट केले असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.