विश्वनाथराव पाटील सहकारी बँक मुरगूडची वार्षिक सभा खेळीमेळीत

बँकेला १ कोटी ४२ लाखांचा नफा: अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील
व्यासपीठावरून सभेला संबोधित करताना बँकेचे अध्यक्ष श्री प्रवीणसिंह विश्वनाथराव पाटील व सभेला उपस्थित मान्यवर सभासद व खातेदारांचा जनसमुदाय.
Published on

मुरगूड येथील विश्वनाथराव पाटील सहकारी बँक मुरगूडची ७८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी बँकेकडे ३१ ऑगस्ट २०२५ अखेर १०३ कोटी ठेवी जमा झाल्या आहेत. एकूण व्यवसाय १७५ कोटी झाला असून १ कोटी ४२ लाख रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष प्रवीणसिंह विश्वनाथराव पाटील यांनी दिली.

सहकार महर्षी विश्वनाथराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन गजानन मोहिते यांच्या हस्ते तर दीपप्रज्वलन एम. बी. ठाणेकर, मलगोंडा पाटील, एम. बी. खामकर, सदाशिव आमते, बाजीराव दबडे यांच्या हस्ते झाले.

यावेळी दहावी-बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या सृष्टी संदीप पाटील, श्रेयस दुर्वास हासबे, प्रविण भैरवनाथ दाभोळे, शौर्यसिंह जयदीप नलवडे, वरद सुनील घाटगे, संचिता राजेंद्र मांगोरे यांना अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

सभासदांना कर्ज वितरण करुन बँकेने यशस्वी उद्योजक केल्याबद्दल प्रवीणसिंह पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास चौगले यांचा सत्कार कुंडलिक भांडवले, मधूकर खतकर, प्रशांत भांडवले, राजेंद्र मांगोरे, विश्वास भारमल, अमर चौगले आदी सभासदांच्या हस्ते करण्यात आला. सभेत सभासद मधुकर करडे, नामदेव गोरुले, अशोक पाटील, राहुल वंडकर, शिवाजी पाटील, शिवाजी करडे, मनाजी सासणे, अशोक खैरे, गजानन साळोखे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

यावेळी संचालक दिग्विजय पाटील, विठ्ठल भारमल, आनंदा पाटील, सुधीर सावर्डेकर, एकनाथ मांगोरे, गणपतराव लोकरे, रघुनाथ कुंभार, विठ्ठल मेटकर, शिवाजीराव पाटील, भिकाजी पाटील, श्रीमती सुनिता मसवेकर, रेवती सुर्यवंशी आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास चौगले यांनी नोटीस व प्रोसिडींग वाचन केले. विजय शेट्टी यांनी अहवाल वाचन केले. तर उपाध्यक्ष वसंतराव शिंदे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन मारुती घाटगे यांनी केले.

Banco News
www.banco.news