Vibe कोडिंगमुळे बँकिंग क्षेत्रात नवी क्रांती

नॉन-कोडर्सही तयार करत आहेत स्मार्ट टूल्स
Vibe कोडिंग
Vibe कोडिंगमुळे बँकिंग क्षेत्रात नवी क्रांती
Published on
  • बँकिंग क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वेगाने प्रवेश करत असताना आता “Vibe कोडिंग” ही संकल्पना चर्चेचा विषय ठरत आहे. पारंपरिक प्रोग्रामिंगचे ज्ञान नसतानाही केवळ साध्या भाषेत सूचना देऊन सॉफ्टवेअर, डॅशबोर्ड, कॅल्क्युलेटर आणि वेबसाइट्स तयार करण्याची क्षमता या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झाली आहे. त्यामुळे बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी, अधिकारी आणि सल्लागार यांच्यासाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

Vibe कोडिंग
सहकारी संस्थांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ताचे भविष्यातील उपयोग
  • Vibe कोडिंगमध्ये वापरकर्ता एआयशी संवाद साधून आपल्याला काय तयार करायचे आहे हे सांगतो आणि एआय त्यानुसार कार्यरत सॉफ्टवेअर तयार करते. गरजेनुसार सुधारणा सांगितल्या की प्रणाली त्यात बदल करते. त्यामुळे कोडिंगचे तांत्रिक कौशल्य नसलेल्यांनाही स्वतःची डिजिटल साधने विकसित करणे शक्य होत आहे.

फिनटेक आणि बँकिंग सल्लागार केविन फार्ले यांच्या मते, “vibe कोडिंगमुळे समस्या समजणाऱ्या व्यक्तीच्या हातात थेट सॉफ्टवेअर निर्मितीची ताकद आली आहे. डेव्हलपर, मोठे बजेट किंवा दीर्घ प्रतीक्षेची गरज उरलेली नाही.”

Vibe कोडिंग
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर : बँकिंग युगातील नवे आव्हान
  • या माध्यमातून बँकिंग क्षेत्रात विविध प्रकारची अंतर्गत आणि ग्राहकाभिमुख साधने तयार करता येतात. उदाहरणार्थ, कर्ज व्याजदर कॅल्क्युलेटर, ठेव वाढ अंदाजक, अनुपालन तपासणी सूची, प्रशिक्षण ट्रॅकिंग सिस्टीम, ऑनबोर्डिंग प्लॅटफॉर्म, मोहीम डॅशबोर्ड आणि दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली सहज विकसित करता येतात. अनेक बँकर्स आज एक्सेलमध्ये करत असलेले काम वेबसाइट किंवा डिजिटल टूलमध्ये रूपांतरित करण्यासाठी व्हायब कोडिंगचा वापर करत आहेत.

विशेष म्हणजे या प्रक्रियेसाठी मोठ्या तांत्रिक टीमची आवश्यकता नसून, AI आधारित प्लॅटफॉर्म्सवर साध्या इंग्रजीत सूचना देऊन प्रोटोटाइप काही तासांत तयार होऊ शकतो. “लव्हेबल”, “क्लॉड कोड”, “Replit”, “Cursor” यांसारखी अनेक साधने यासाठी लोकप्रिय होत आहेत.

Vibe कोडिंग
AI चा जबाबदार, नैतिक वापर केल्यास बँकिंगमध्ये नवे युग

मात्र, बँकिंग क्षेत्रासाठी डेटा सुरक्षा आणि गोपनीयता महत्त्वाची असल्याने ग्राहकांची वैयक्तिक माहिती (PII) किंवा संवेदनशील डेटा AI मॉडेलमध्ये टाकताना संस्थेच्या धोरणांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

बँकिंग क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाच्या पुढील टप्प्यात व्हायब कोडिंग हे एक महत्त्वाचे कौशल्य ठरणार असल्याचे चित्र आहे. कमी वेळेत, कमी खर्चात आणि कमी तांत्रिक अडथळ्यांसह अंतर्गत प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनवण्याची क्षमता या तंत्रज्ञानात असल्याने अनेक वित्तीय संस्था आता त्याकडे गांभीर्याने पाहू लागल्या आहेत.

तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीला छोट्या प्रकल्पांपासून सुरुवात करणे योग्य ठरते. साधे कॅल्क्युलेटर किंवा अंतर्गत वापराचे ट्रॅकर तयार करताना वापरकर्त्यांना या तंत्रज्ञानाची सवय होते आणि नंतर मोठे प्रकल्प हाताळणे सोपे जाते.
Banco News
www.banco.news