
फिशिंग (Phishing): फसवणूक टाळण्यासाठी काय करावे!
फिशिंग हा एक सामान्य सायबर गुन्हा आहे ज्यामध्ये गुन्हेगार खोटे दुवे (fake links) वापरून लोकांना फसवतात. हे दुवे ईमेल किंवा वेबसाईट्सच्या स्वरूपात विश्वासार्ह स्रोतांपासून(ओळखीच्या लोकांकडून) आलेले वाटतात, परंतु प्रत्यक्षात ते वापरकर्त्यांना आपल्या जाळ्यात ओढून अशा फसव्या साईटवर नेतात जिथे त्यांची वैयक्तिक माहिती, लॉगिन तपशील, किंवा आर्थिक माहितीची चोरी केली जाते. काहीवेळा गुन्हेगार लिंकद्वारे तुम्हाला बक्षीस मिळाल्याचा भास निर्माण करतात. त्यामुळेआर्थिक लाभाच्या आशेने उत्सुकता चाळवून लोकांना क्लिक करायला भाग पाडतात. त्यामुळे अशा लिंकबद्दल आवश्यक खात्री होत नाही तोपर्यंत अजिबात क्लिक करू नका. फिशिंगद्वारे तुमच्या उपकरणामध्ये मालवेअर (malware) देखील स्थापित केले जाऊ शकते, ज्यामुळे सायबर गुन्हेगारांना तुमच्या बँक खात्यांत अनधिकृत प्रवेश मिळतो.
करावयाच्या गोष्टी (Dos):
सावध राहा: ओळखीच्या व्यक्तीकडून आलेले अनपेक्षित संदेश देखील काळजीपूर्वक तपासा.
URL तपासा: दुव्यावर माउस नेऊन खरे गंतव्य (destination)(नेमके कोठून आले) तपासा (कारण पत्ता खोटा असतो) आणि फरक ओळखा.
खोटे दुवे (fake links) पाठवणाऱ्यांची खात्री करा: संदेशाची सत्यता तपासण्यासाठी खात्रीशीर पद्धतीने प्रेषकाशी संपर्क साधा.
नियमित अद्यतन करा: सॉफ्टवेअर आणि सिस्टीम नियमितपणे अपडेट ठेवा, जेणेकरून सुरक्षेतील त्रुटी बंद होतील.
फिशिंग अहवाल द्या: फिशिंग प्रयत्न आढळल्यास संबंधित प्राधिकरणांना किंवा प्लॅटफॉर्मना लगेच कळवा.
करू नयेत अशा गोष्टी (Don'ts):
संशयास्पद दुव्यांवर क्लिक करू नका: अशा संदेशांना लगेच डिलीट करा.
अनसबस्क्राइब व ब्लॉक करा: संशयास्पद दुवे असलेले ईमेल आल्यास अनसबस्क्राइब करा आणि प्रेषकाला ब्लॉक करा.
अधिकृत वेबसाईटला भेट द्या: नेहमी आर्थिक व्यवहारांसाठी थेट अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि वेबसाईट सुरक्षित आहे का (HTTPS आणि padlock चिन्हासह) हे तपासा.