वसई विकास सहकारी बँकेत अनिवार्य सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम संपन्न

CERT-In तज्ज्ञांचे मार्गदर्शन; आयटी आणि सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर भर
Cyber security News - VVSB Bank
वसई विकास सहकारी बँकेत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम
Published on: 

वसई : डिजिटल युगात वाढत्या सायबर धोक्यांपासून बँक, ग्राहक आणि वित्तीय डेटाचे संरक्षण करण्यासाठी 'वसई विकास सहकारी बँक लि.' (शेड्युल्ड बँक) तर्फे अनिवार्य सायबर सुरक्षा जनजागृती प्रशिक्षण (Mandatory Cyber Security Awareness Training) कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. वसई पश्चिम येथील देवतलाव सोसायटी हॉल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना "YOU ARE THE FIRST HUMAN FIREWALL OF VVSB BANK" (तुम्ही व्हीव्हीएसबी बँकेची पहिली मानवी सुरक्षा भिंत आहात) अशी होती.

या प्रशिक्षण कार्यक्रमात बँकेच्या संचालक मंडळासह कार्यकारी व वरिष्ठ व्यवस्थापन, शाखा व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी, सिस्टीम युजर्स, माहिती तंत्रज्ञान (IT) आणि माहिती सुरक्षा (IS) टीम, नव्याने रुजू झालेले कर्मचारी तसेच बँकेचे TURING 4.0 CBS आणि डिजिटल स्विच व्हेंडर 'M2P' च्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

हे विशेष प्रशिक्षण फिनिक्स टेक्नोसायबर (CERT-In एम्पॅनेल्ड संस्था) चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवी रावल आणि वसई विकास सहकारी बँकेचे मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (CISO) व डेटा प्रोटेक्शन अधिकारी (DPO) श्री. अशोक एच. एन. तिवारी यांनी संयुक्तपणे दिले.

Cyber security News - VVSB Bank
वसई विकास बँकेचे नवे 'रूपे सिलेक्ट' डेबिट कार्ड लाँच!

या सत्रांमध्ये IT गव्हर्नन्स, सायबर आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटी गव्हर्नन्स, डिजिटल बँकिंग सुरक्षा, ईमेल फिशिंग, सोशल इंजिनिअरिंग, रॅन्समवेअर, सायबर फसवणूक प्रतिबंध, सायबर क्रायसिस मॅनेजमेंट, GRC, 'डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (DPDP) कायदा २०२३' आणि 'DPDP नियम २०२५', रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मार्गदर्शक सूचना व ग्राहक डेटा गोपनीयता यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली. याशिवाय, सहभागींना संभाव्य धोके ओळखणे आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करणे सहज शक्य व्हावे यासाठी सायबर हल्ल्यांचे थेट प्रात्यक्षिक (Cyber-attack demonstration) दाखवण्यात आले.

प्रशिक्षणातील संकल्पना कर्मचाऱ्यांना किती समजल्या याचे मूल्यमापन करण्यासाठी आणि जनजागृती वाढवण्यासाठी 'सायबर सुरक्षा क्विझ स्पर्धा' आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांचा बँकेचे माननीय अध्यक्ष श्री. आशय राऊत, IT स्ट्रॅटेजी कमिटीचे अध्यक्ष श्री. अभय चौधरी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप वाय. ठाकूर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

अध्यक्ष, सीईओ व IT कमिटी अध्यक्षांनी सोप्या आणि क्लिष्ट नसलेल्या भाषेत अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केल्याबद्दल श्री. रवी रावल व श्री. अशोक तिवारी यांचे कौतुक केले. तसेच हा कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल IT, IS आणि HR विभागाचे आभार मानले. या प्रसंगी बँकेच्या व्यवस्थापनाने मोठी घोषणा करत सांगितले की, सर्व कर्मचाऱ्यांसाठी हे अनिवार्य सायबर सुरक्षा प्रशिक्षण दर सहा महिन्यांनी घेतले जाईल. तसेच IT आणि IS टीमसाठी दर तिमाहीला विशेष प्रगत सायबर सुरक्षा प्रशिक्षण आयोजित केले जाईल, जेणेकरून बँकेची सायबर सुरक्षा यंत्रणा सदैव सज्ज राहील.

Cyber security News - VVSB Bank
वसई विकास बँकेतर्फे सहकार सप्ताह निमित्त सायबर सुरक्षा कार्यक्रमांचे आयोजन

कार्यक्रमप्रसंगी बँकेतर्फे अध्यक्ष श्री. आशय राऊत व सीईओ श्री. दिलीप वाय. ठाकूर यांनी श्री. रवी रावल यांना मोलाच्या योगदानाबद्दल स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली. या उपक्रमामुळे वसई विकास सहकारी बँकेने आपली सायबर सुरक्षा, ग्राहक डेटा संरक्षण आणि आरबीआयच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

Banco News
www.banco.news