

गुजरातमधील आघाडीची सहकारी बँक म्हणून ओळख असलेल्या द वराछा को-ऑप. बँक लिमिटेड, सुरत यांनी नवीन भरती अधिसूचना जाहीर केली आहे. बँकेने चीफ कम्प्लायन्स ऑफिसर (CCO) पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. बँकेच्या सुरत येथील कार्यालयासाठी ही भरती करण्यात येणार आहे.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान 10 वर्षांचा बँकिंग अधिकारी म्हणून अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवाराने RBI च्या सर्व नियामक अटी, वैधानिक तरतुदी, सर्क्युलर्स, निर्देश आणि अनुपालन नियमांबाबत सक्षम ज्ञान व अनुभव असणे अनिवार्य आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रात काम केलेल्या अधिकाऱ्यांना विशेष प्राधान्य मिळू शकते.
बँकेने जाहीर केलेल्या तपशीलानुसार, अर्जदार खालीलपैकी कोणत्याही शैक्षणिक पात्रतेचा असावा:
M.Com
MBA Finance
MCA
CA
CS
तसेच JAIIB किंवा CAIIB पात्रता असल्यास उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 55 वर्षे असावे.
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन संपूर्ण तपशील व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तपासावी.
अधिक माहिती व ऑनलाइन अर्जासाठी संकेतस्थळ:
www.varachha.bank.in
सुरत, नवसारी, अंकलेश्वर, अहमदाबाद आणि राजकोट या शहरांमध्ये कार्यरत असलेली The Varachha Co-op. Bank Ltd. ही राज्यातील प्रमुख मल्टिस्टेट को-ऑप. बँक म्हणून ओळखली जाते. बँकेचे मुख्य कार्यालय "सहकार भवन", सृष्टीनगर, सर्थाणा जकतनाका, सुरत येथे आहे.