तेलंगणा स्टेट को-ऑप बँकेच्या नफ्यात ६३% वाढ

सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी ठरतेय आदर्श मानक
तेलंगणा स्टेट को-ऑप अ‍ॅपेक्स बँक
तेलंगणा स्टेट को-ऑप अ‍ॅपेक्स बँक
Published on

हैदराबाद: तेलंगणा स्टेट को-ऑपरेटिव्ह अ‍ॅपेक्स बँक लिमिटेड (TSCAB) ने २०२४-२५ या आर्थिक वर्षात ६३% पेक्षा अधिक नफा कमवून आपली आर्थिक स्थिती भक्कम करून देशभरातील सहकारी बँकिंग क्षेत्राचे लक्ष वेधले आहे. बँकेचा करपूर्व निव्वळ नफा ७०.९५ कोटी रुपयांवरून थेट ११५.३६ कोटी रुपयांवर गेला आहे, ही अत्यंत उल्लेखनीय वाढ आहे.

कर्जवाढीत ३१% वाढ:

बँकेच्या (TSCAB) कर्ज आणि अ‍ॅडव्हान्स पोर्टफोलिओत मोठी भर पडली असून, तो १२,९७४.७७ कोटींवरून १६,९७५.६९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हे आकडे बँकेच्या कर्ज वितरण क्षमतेतील उल्लेखनीय वाढ दर्शवतात.

व्यवसायात २४% हून अधिक वाढ:

बँकेची एकूण व्यवसाय उलाढाल २०,९५५.५१ कोटींवरून २४,९७१.९५ कोटींवर पोहोचली आहे, जी बँकेच्या ग्रामीण आणि अर्धशहरी भागातील पोहोच विस्ताराचा स्पष्ट पुरावा आहे.

एनपीए नियंत्रणात, मालमत्तेची उत्कृष्ट गुणवत्ता:

बँकेने (TSCAB) एनपीए पातळी फक्त ०.०६% इतकी राखली असून, सलग दुसऱ्या वर्षी निव्वळ एनपीए शून्य राखण्यात यश मिळवलेले आहे. ही मालमत्ता गुणवत्तेतील सातत्यपूर्ण कामगिरी, बँकेच्या मजबूत व्यवस्थापन क्षमतेचे द्योतक आहे.

मजबूत भांडवली ताकद:

बँकेचे CRAR १०.१५% आहे, जे नियामक मर्यादेपेक्षा जास्त आहे.

बँकेचा १,६२४.०४ कोटी स्वनिधी आणि निव्वळ संपत्ती १,३५८.२६ कोटी रुपयांवर पोहोचली असून, भागभांडवलही ४१२.१० कोटी रुपयांपर्यंत वाढलेले आहे – ही वाढ बँकेवरील सभासदांचा विश्वास दर्शवते.

गोल्ड लोन आणि कर्ज क्षेत्रात विस्तार:

गोल्ड लोन पोर्टफोलिओतही बँकेने ४०% पेक्षा जास्त वाढ केलेली असून, तो १,०७०.४३ कोटींवरून १,४९८.७६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

CASA आणि CD गुणोत्तरात बदल:

जिथे CASA गुणोत्तर थोडकं घसरून १३.६४% झाले, तिथे CD गुणोत्तर १६२.५८% वरून २१२.३०% पर्यंत वाढले आहे. हे आकडे बँकेच्या आक्रमक कर्ज धोरणाचे संकेत देतात.

Banco News
www.banco.news