तंत्रज्ञानामुळे शून्य शिल्लक खाते उघडणे झाले अधिक जलद आणि पूर्णतःपेपरलेस

मोबाईल बँकिंग, ई-KYC आणि एआय-आधारित प्रणालींमुळे बँकिंग क्षेत्रात मोठे डिजिटल परिवर्तन
पेपरलेस
पेपरलेस
Published on

डिजिटल बँकिंगच्या वाढत्या वापरामुळे शून्य शिल्लक बचत खाते उघडणे आज काही मिनिटांत आणि पूर्णत: पेपरलेस पद्धतीने शक्य झाले आहे. बँकांनी त्यांच्या ऑनलाइन सेवांना अधिक सक्षम केल्याने ग्राहकांना शाखेत जाण्याची किंवा कागदपत्रांचा ढिगारा सांभाळण्याची गरज राहिलेली नाही.

मोबाईल बँकिंग अँप्सद्वारे ग्राहकांना खात्याचा बॅलन्स तपासण्यापासून ते पैसे ट्रान्सफर करण्यापर्यंत सर्व सुविधा उपलब्ध होत आहेत. अनेक बँका वापरकर्त्याच्या खर्चाच्या पद्धतींचे एआयद्वारे विश्लेषण करून वैयक्तिक वित्तीय सल्ल्याही देत आहेत. व्हर्चुअल डेबिट कार्ड्समुळे व्यवहार अधिक सुरक्षित आणि जलद होत असून फिजिकल कार्डची आवश्यकता कमी झाली आहे.

पेपरलेस
नवे आधार ॲप : आता QR स्कॅनद्वारे माहिती शेअरिंग

डिजिटल ऑनबोर्डिंगमुळे खाते उघडण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी झाली आहे. पॅन आणि आधार क्रमांक देताच ओळख पडताळणी तात्काळ पूर्ण होते. व्हिडिओ-KYCमुळे प्रतिनिधीशी थेट व्हिडिओ कॉलद्वारे KYC पूर्ण करता येते, ज्यासाठी शाखेला भेट देण्याची अजिबात गरज नसते. अर्ज तपासल्यानंतर ग्राहकाला खाते त्वरित सक्रिय करता येते.

पेपरलेस बँकिंगमुळे ग्राहकांना अनेक फायदे मिळत आहेत. रिअल-टाइम पेमेंट्समुळे पैसा तत्काळ उपलब्ध राहतो. अँपवरील डॅशबोर्डमधून बचत, खर्च आणि गुंतवणुकीचे स्पष्ट चित्र दिसते. व्यवहारांवरील सततचे अलर्ट्स सुरक्षा वाढवतात तर ऑटो-पे सुविधेमुळे बिल भरणे सहज शक्य होते. कागदाचा वापर कमी झाल्यामुळे पर्यावरणाला सकारात्मक हातभार लागतो.

पेपरलेस
वारसाहक्काचा रोडमॅप: बँक खाते, मालमत्ता, म्युच्युअल फंड

डिजिटल बँकिंग आणि एआय-आधारित तंत्रज्ञानामुळे शून्य शिल्लक खाते उघडणे अधिक सहज, सुरक्षित आणि सर्वांसाठी उपलब्ध झाले आहे. बँकिंग क्षेत्रातील ही वाटचाल भविष्यातील व्यवहार अधिक स्मार्ट, जलद आणि पारदर्शक करण्यास मदत करणार आहे.

Banco News
www.banco.news