
करदात्यांना अनेकदा भांडवली नफा, लाभांश आणि अनेक उत्पन्न स्रोतांशी संघर्ष करावा लागतो, त्यामुळे विवरणपत्रे भरणे गुंतागुंतीचे आणि वेळखाऊ बनते. हा त्रास दूर करून ग्राहकांना प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याचा जलद, अधिक अचूक आणि किफायतशीर मार्ग प्रदान करण्यासाठी एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने (पूर्वीची दि शामराव विठ्ठल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड) भारतातील सर्वात मोठ्या कर फाइलिंग प्लॅटफॉर्म (कर भरणा सेवा ) क्लिअरटॅक्सशी भागीदारी केलेली असून करदात्यांना ही सुविधा देणारी देशातील पहिली सहकारी बँक बनली आहे.
एसव्हीसी बँक-क्लियरटॅक्स सहकार्य ही कर भरणा प्रक्रिया सोपी करण्याचा आणि त्यातील अनुपालन त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न करते. ग्राहक एका विशेष एसव्हीसी बँक लिंकद्वारे लॉग इन करू शकतात, ८० हून अधिक एजंटांकडून थेट डेटा आयात करू शकतात, आधीच भरलेल्या सूचनांचे पुनरावलोकन करू शकतात आणि काही क्लिक्समध्ये सुरक्षितपणे फाइल करू शकतात.
ही सेवा अनेक स्वयंचलित वैशिष्ट्ये देते, ज्यामध्ये शून्य मॅन्युअल डेटा एंट्री, तोट्याचे स्वयंचलित सेट-ऑफ (तोट्याची स्वयंचलित भरपाई ), दीर्घकालीन आणि अल्पकालीन भांडवली नफ्याची अचूक गणना आणि कर-बचत कपातीसाठी स्मार्ट प्रॉम्प्ट (स्वयंचलित सूचना) यांचा समावेश आहे.
यामध्ये कर सूचनांचे मोफत व्यवस्थापन देखील समाविष्ट आहे, या प्रक्रियेत प्रत्येक टप्प्यावर तज्ञांचा पाठिंबा उपलब्ध असून एसव्हीसी बँकेचे ग्राहक CTBSVC कोड वापरून सेवा दाखल करण्यावर ७१ टक्के पर्यंत सूट मिळविण्यास पात्र आहेत.
१९०६ मध्ये स्थापन झालेली एसव्हीसी बँक ही भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात मान्यताप्राप्त सहकारी बँकांपैकी एक आहे. आज ती एक बहु-राज्य अनुसूचित (शेडूल्ड) सहकारी बँक म्हणून कार्यरत असून दहा राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात या बँकेचे कार्यक्षेत्र आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत, बँकेने एकूण व्यवसाय ३९,३५३ कोटी रुपये आणि निव्वळ नफा २४१ कोटी रुपये नोंदवला, जो मागील वर्षाच्या तुलनेत १०.५२ टक्के जास्त आहे. एकूण एनपीए १.९६ टक्के होते तर निव्वळ एनपीए ०.२५ टक्क्यांपर्यंत घसरले, ज्यामध्ये प्रोव्हिजनिंग कव्हरेज ८७.५४ टक्के होते.
मुंबईत मुख्यालय असलेली ही बँक २०३ शाखा आणि २१९ एटीएम चालवते आणि २,४०० हून अधिक कर्मचारी या बँकेत काम करतात. तिच्या व्यावसायिक कामगिरीमध्ये रिटेल, कॉर्पोरेट आणि आंतरराष्ट्रीय बँकिंगचा समावेश आहे, ज्यामध्ये तिच्या आंतरराष्ट्रीय बँकिंग विभागाद्वारे परकीय चलन ऑपरेशन्सचा समावेश आहे.
एसव्हीसी बँकेला कामगिरी आणि प्रशासनासाठी सातत्याने मान्यता मिळालेली आहे. राष्ट्रीय सहकारी सन्मान समारोह २०२५ मध्ये, तिने सर्वोत्कृष्ट नागरी सहकारी बँक, सर्वोत्कृष्ट मल्टी स्टेट नागरी सहकारी बँक आणि वर्षातील सर्वोत्कृष्ट अध्यक्ष असे पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. तंत्रज्ञान उपक्रम, कार्यस्थळ पद्धती आणि क्षेत्रीय नेतृत्व यासाठी ईटी नाऊ, इंडियन बँक्स असोसिएशन आणि "बँको ब्लू रिबन" यांनी देखील तिला सन्मानित केलेले आहे.
क्लियरटॅक्सशी हातमिळवणी करून, एसव्हीसी बँकेने ग्राहकांना आवश्यक वित्तीय सेवांमध्ये सहज प्रवेश देण्यासाठी सहकारी तत्त्वे आणि डिजिटल नवोपक्रम यांचे मिश्रण करण्याच्या आपल्या धोरणाला बळकटी दिलेली आहे.