SVC बँकेच्या मुख्य वित्त अधिकारी साकेत माहेश्वरी यांना ET CFO Awards 2026 मध्ये ‘Best CFO’ पुरस्कार

कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील उत्कृष्टतेसाठी गौरव; पारदर्शकता, मजबूत वित्तीय व्यवस्थापन आणि नियामक अनुपालनाला मान्यता
श्री. अमोल डेठे (संपादक, ET CFO), श्री. साकेत माहेश्वरी  (मुख्य वित्त अधिकारी, SVC बँक) आणि श्री. केवाल हांडा (माजी व्यवस्थापकीय संचालक, Pfizer Ltd. व माजी नॉन-एक्झिक्युटिव्ह संचालक,
श्री. अमोल डेठे (संपादक, ET CFO), श्री. साकेत माहेश्वरी (मुख्य वित्त अधिकारी, SVC बँक) आणि श्री. केवाल हांडा (माजी व्यवस्थापकीय संचालक, Pfizer Ltd. व माजी नॉन-एक्झिक्युटिव्ह संचालक,
Published on

मुंबई : एसव्हीसी बँक (पूर्वीची Shamrao Vithal Co-operative Bank Ltd.) चे मुख्य वित्त अधिकारी (CFO) साकेत महेश्वरी यांना प्रतिष्ठित ET CFO Awards 2026 मध्ये Excellence in Corporate Governance या श्रेणीत Best CFO Award प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे बँकेच्या मजबूत कॉर्पोरेट गव्हर्नन्स फ्रेमवर्क, पारदर्शक कार्यपद्धती, नैतिक नेतृत्व आणि वित्तीय व्यवस्थापनातील उत्कृष्टतेला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

ET CFO Awards हा देशातील विविध उद्योग क्षेत्रांतील उत्कृष्ट वित्तीय नेतृत्व, जोखीम व्यवस्थापन आणि धोरणात्मक आर्थिक व्यवस्थापन यांचा गौरव करणारा महत्त्वाचा मंच आहे. या सोहळ्यात देशभरातील वरिष्ठ वित्तीय अधिकारी, धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते.

या पुरस्कारामुळे SVC बँकेने मजबूत कॉर्पोरेट गव्हर्नन्स, वित्तीय शिस्त आणि नियामक अपेक्षांनुसार संस्थात्मक पारदर्शकता कायम ठेवण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुनःप्रचिती दिली आहे. तसेच या गौरवामुळे सहकारी बँकिंग क्षेत्रात SVC बँकेची विश्वासार्ह आणि जबाबदार वित्तीय संस्थेची प्रतिमा अधिक बळकट झाली आहे.

बँकेची कामगिरी

1906 मध्ये स्थापन झालेली SVC बँक ही देशातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक जुनी आणि प्रतिष्ठित संस्था आहे. सध्या बँकेचे जाळे 10 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेश यांमध्ये विस्तारलेले आहे.

31 मार्च 2025 पर्यंत बँकेचा एकूण व्यवसाय ₹39,353 कोटी इतका आहे. बँकेचा निव्वळ नफा ₹241 कोटी पर्यंत पोहोचला असून त्यात 10.52% वाढ झाली आहे. बँकेचा Gross NPA 1.96% तर Net NPA 0.25% पर्यंत कमी झाला आहे. तसेच Provisioning Coverage Ratio (PCR) 87.54% पर्यंत पोहोचला आहे.

शाखा नेटवर्क

मुंबई मुख्यालय असलेल्या SVC बँकेकडे देशभरात

  • 203 शाखा

  • 220 एटीएम

  • 2,400 पेक्षा अधिक कर्मचारी

असून बँक रिटेल, कॉर्पोरेट आणि आंतरराष्ट्रीय बँकिंगसह विविध वित्तीय सेवा पुरवते.

इतर उल्लेखनीय पुरस्कार

अलीकडील काळात बँकेला अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये —

  • IBA Banking Technology Conference 2024-25 मध्ये Best Fintech & DPI Adoption आणि Best Tech Talent (विजेता)

  • All India UCB Summit & Awards 2025 मध्ये Leader Award

  • FCBA Awards 2025 मध्ये Best HR Transformation आणि Best Audit Transformation

  • Silver Feather Awards 2025 मध्ये Most Innovative CFO Award

  • ET Now Best Organisations to Work 2025

या सन्मानांमुळे सहकारी बँकिंग क्षेत्रातील SVC बँकेचे नेतृत्व, तंत्रज्ञानाचा वापर आणि वित्तीय समावेशनासाठीचे योगदान अधोरेखित झाले आहे.

Banco News
www.banco.news