सोने खरेदी करताना सावधान! “हॉलमार्क” तपासले नाही तर होईल मोठे नुकसान

सोन्याच्या कॅरेटनुसार बदलतो खरा दर — चुकीच्या गणनेतून हजारोंचा तोटा.
हॉलमार्क
हॉलमार्क
Published on

मुंबई — सणासुदीचा काळ आणि लग्नसराईचा सीझन सुरू झाला की सोन्याच्या दागिन्यांची खरेदी वाढते. पण या सोन्याच्या चकमकी खाली लपलेला एक महत्त्वाचा मुद्दा अनेकांच्या नजरेतून सुटतो — हॉलमार्क कोड आणि सोन्याचं खरं कॅरेट मूल्य.

तज्ज्ञांच्या मते, “हॉलमार्क तपासल्याशिवाय सोनं घेणं म्हणजे फसवणुकीचं आमंत्रण आहे.” अनेक वेळा ग्राहक 24 कॅरेट दराने पैसे देतात, पण प्रत्यक्षात त्यांना 22 किंवा 21 कॅरेट सोनं मिळतं. परिणामी, त्यांचा हजारो रुपयांचा तोटा होऊ शकतो.

हॉलमार्क कोड आणि त्याचा अर्थ

हॉलमार्क कोड सोन्याचं खरं कॅरेट

750 18 कॅरेट

875 21 कॅरेट

916 22 कॅरेट

958 23 कॅरेट

999 24 कॅरेट

उदाहरणाने समजा

जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याची 10 ग्रॅम बांगडी घेतली आणि हॉलमार्क 916 असेल, तर 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,25,070 असल्यास

खरा भाव = (₹1,25,070 × 22 / 24) = ₹1,14,798

म्हणजेच, कॅरेटप्रमाणे सोन्याचं मूल्य वेगळं ठरतं. हॉलमार्क न पाहता खरेदी केल्यास तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना

  • सोनं खरेदी करण्याआधी हॉलमार्क चिन्ह तपासा.

  • BIS प्रमाणित दागिनेच खरेदी करा.

  • बिल आणि कॅरेटची माहिती लिहिलेला दस्तऐवज घ्या.

  • ऑनलाइन खरेदीत फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत वेबसाइट किंवा विश्वासार्ह ज्वेलरकडूनच खरेदी करा.

सोन्यात गुंतवणूक ही सुरक्षित असली तरी योग्य माहिती नसल्यास नुकसान होऊ शकतं.
Banco News
www.banco.news