सोलापूर जनता सहकारी मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँकेत 'मेगा रिक्रूटमेंट' जाहीर

महाराष्ट्र-कर्नाटकातील तब्बल ७१ जागांसाठी मेगाभरती; 'या' तारखेपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज
Solapur Janata bank recruitment 2026 online form
सोलापूर जनता बँकेत ७१ जागांवर मेगा रिक्रूटमेंट
Published on

सोलापूर: सहकार क्षेत्रातील अग्रगण्य आणि ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेली सोलापूर जनता सहकारी बँक लि., सोलापूर (मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक) च्या वतीने विस्तारत्या व्यवसाय कक्षेसाठी विविध पदांच्या एकूण ७१ जागांसाठी अधिकृत भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. बँकेच्या वतीने 'गगनभरारी' मुख्य कार्यालय, शिवस्मारक संकुल, गोल्डफिंच पेठ, सोलापूर येथून या संदर्भातील अधिकृत जाहीर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही राज्यांत आपला विस्तार करणाऱ्या या बँकेत करिअर करण्याची सुवर्णसंधी उमेदवारांना मिळणार आहे.

पदांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे:

बँकेने व्यवस्थापकीय पातळीपासून ते लिपिक वर्गापर्यंतच्या जागांसाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये प्रामुख्याने दोन वेगवेगळ्या माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार आहेत:

१) थेट ई-मेलद्वारे अर्ज करायची पदे (Senior Positions):

  • सरव्यवस्थापक (General Manager - G.M.): २ पदे

  • सहा. सरव्यवस्थापक (Asst. General Manager - A.G.M.): ४ पदे

टीप: या वरिष्ठ व्यवस्थापकीय पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज admin@sjsbbank.com या ई-मेल आयडीवर पाठवायचे आहेत.

२) संकेतस्थळावरून (Website) ऑनलाईन अर्ज करायची पदे:

  • ज्युनिअर ऑफिसर (Junior Officers): १२ पदे

  • क्लार्क (Clerical / Trainee Clerk): ५३ पदे

टीप: या दोन्ही पदांसाठी उमेदवारांना बँकेच्या www.sjsb.bank.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल.

  • सोलापूर जनता सहकारी बँक ही एक नामांकित 'मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक' म्हणून ओळखली जाते. बँकेचे मुख्य कार्यालय सोलापूर येथे असून, तिचा शाखा विस्तार महाराष्ट्रातील सोलापूर, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड, सातारा या ११ जिल्ह्यांमध्ये तसेच कर्नाटक राज्यातील विजयपूर (विजापूर) येथे आहे.

  • या सर्व ठिकाणच्या शाखांसाठी 'ट्रेनी क्लार्क' आणि 'ज्युनिअर ऑफिसर' पदांची भरती केली जाणार असून, संबंधित जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल, असे बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या तारखा आणि अधिक माहिती:

  • ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात: १२ जून २०२६

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: २७ जून २०२६

वरील चारही पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव आणि इतर सविस्तर अटी व शर्ती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.sjsb.bank.in) आवर्जून भेट द्यावी. सहकार आणि बँकिंग क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवू इच्छित असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. कालमर्यादा लक्षात घेऊन उमेदवारांनी २७ जूनपूर्वी आपले अर्ज सादर करावेत.

Banco News
www.banco.news