

श्री रुक्मिणी नागरी सहकारी बँक लि., श्रीगोंदा येथे आयटी (माहिती तंत्रज्ञान) विभागासाठी अधिकारी आणि सहायक अधिकारी पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेच्या मुख्य कार्यालयामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील नामांकित नागरी सहकारी बँक म्हणून ओळख असलेल्या या बँकेत संगणकीय अधिकारी (आय.टी.) आणि सहायक संगणकीय अधिकारी अशी एकूण दोन पदे भरावयाची आहेत. बँकिंग क्षेत्रातील आयटी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही भरती करण्यात येत आहे.
१) संगणकीय अधिकारी (आय.टी.)
शैक्षणिक पात्रता: या पदासाठी उमेदवाराकडे B.E.Com, B.Tech (Computer), MCA, BCA, MCS, BCS, MCM किंवा IT संबंधित पदवी असणे आवश्यक आहे.
अनुभव: डेटासेंटर, नेटवर्किंग, मायक्रोसॉफ्ट सिस्टीम्स आणि बँकिंग क्षेत्रातील आयटी विभागात किमान २ ते ३ वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
वय: उमेदवाराचे किमान वय २४ वर्षे असणे बंधनकारक आहे.
२) सहायक संगणकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता: या पदासाठी BCS, MCM, MCA, BCA, MCS किंवा B.Sc (Computer) पात्रता आवश्यक आहे.
अनुभव: बँकिंग क्षेत्रातील आयटी विभागात अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
वय: उमेदवाराचे किमान वय २२ वर्षे असावे.
पात्र उमेदवारांनी आपली संपूर्ण माहिती असलेला अर्ज (सी.व्ही.) शैक्षणिक पात्रता व अनुभव प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रतींसह बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवावा. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ८ दिवसांच्या आत पोहोचणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
श्री रुक्मिणी सहकारी बँक लि., श्रीगोंदा
मुख्य कार्यालय – मु.पो. “सिटी प्राईड” बिल्डिंग,
दौंड–जामखेड रोड, श्रीगोंदा,
ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर – ४१३७०१ (महाराष्ट्र)
भरती प्रक्रियेमध्ये आवश्यकतेनुसार अटी व पात्रता शिथिल करण्याचे अधिकार बँकेच्या मा. व्यवस्थापन मंडळाकडे राखीव ठेवले आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवार बँकेच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.
दिनांक : २७ नोव्हेंबर २०२५
स्थळ : श्रीगोंदा