

अहिल्यानगर: श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लिमिटेड, टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांनी बँकेतील विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या भरतीअंतर्गत व्यवस्थापकीय संचालक / मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), जनरल मॅनेजर, शाखा व्यवस्थापक, ज्युनिअर ऑफिसर, आयटी ऑफिसर तसेच शिपाई व वाहन चालक अशा विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
बँकिंग व वित्तीय क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती एक उत्तम संधी मानली जात आहे.
व्यवस्थापकीय संचालक / मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)
या पदासाठी उमेदवार पदव्युत्तर असणे आवश्यक असून CAIIB, बँकिंग व फायनान्स डिप्लोमा, सहकारी व्यवसाय व्यवस्थापन डिप्लोमा किंवा समतुल्य पात्रता आवश्यक आहे. तसेच सी.ए., ICWA किंवा MBA (Finance) धारकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. संबंधित क्षेत्रात किमान 10 वर्षांचा अनुभव आणि किमान 40 वर्षे वय आवश्यक आहे.
जनरल मॅनेजर / असिस्टंट जनरल मॅनेजर
पदव्युत्तर किंवा MBA सोबत CAIIB किंवा समतुल्य पात्रता आवश्यक असून बँकिंग किंवा वित्तीय क्षेत्रातील किमान 7 वर्षांचा अनुभव आणि किमान 35 वर्षे वय अपेक्षित आहे.
शाखा व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी / ऑडिटर / वरिष्ठ अधिकारी / अकाउंटंट
या पदांसाठी उमेदवार पदवीधर असावा तसेच CAIIB किंवा समतुल्य पात्रता आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रात किमान 5 वर्षांचा अनुभव आणि किमान 30 वर्षे वय आवश्यक आहे.
ज्युनिअर ऑफिसर
पदवीधर CAIIB / बँकिंग व फायनान्स डिप्लोमा / सहकारी व्यवसाय व्यवस्थापन डिप्लोमा किंवा समतुल्य पात्रता आवश्यक असून बँकिंग किंवा वित्तीय क्षेत्रात किमान 3 वर्षांचा अनुभव व किमान 25 वर्षे वय अपेक्षित आहे.
आय.टी. ऑफिसर (EDP विभाग)
B.Sc (Computer), M.Sc (Computer) किंवा B.E (Computer) पात्रता आवश्यक असून बँकिंग किंवा वित्तीय क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा 25 ते 35 वर्षे आहे.
शिपाई (Peon)
SSC किंवा HSC उत्तीर्ण असणे आवश्यक असून MSCIT व संगणक ज्ञान आवश्यक आहे. किमान वय 20 वर्षे आहे.
वाहन चालक (Driver)
SSC किंवा HSC पात्रता आवश्यक असून वैध वाहन चालक परवाना व संगणक ज्ञान आवश्यक आहे. किमान वय 20 वर्षे आहे.
पात्र उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसांच्या आत शैक्षणिक पात्रतेची व अनुभव प्रमाणपत्रांची प्रती जोडून आपले अर्ज सादर करावेत.
अनुभवी उमेदवारांच्या बाबतीत शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादेत सवलत देण्याचा अधिकार बँकेकडे राखीव असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बँकेच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा.
संपर्क तपशील :
श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लिमिटेड
पत्ता : आप- टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर – 414304
फोन : 02488-230128 / 230288
ई-मेल : headoffice@ssssbankltd.com