
पिंपरी चिंचवड शहरामध्ये रु. २५० कोटीपेक्षा जास्त व्यवसाय असलेल्या श्रीगणेश सहकारी बँक मर्यादित, नवी सांगवी, पुणे ६१ या बँकेकरिता खालील पदांसाठी सरळ सेवा पध्दतीने उमेदवारांची भरती करावयाची आहे. त्यासाठी खालील निकषांप्रमाणे पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पद व पदसंख्या:
• मुख्य कार्यकारी अधिकारी-१
• उप मुख्य कार्यकारी अधिकारी-१
• वरिष्ठ व्यवस्थापक / शाखा व्यवस्थापक-५
• मानव संसाधन (एचआर) व्यवस्थापक-१
• अधिकारी-५
शैक्षणिक पात्रता:
१) मुख्य कार्यकारी अधिकारी / उप मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाकरीता रिझर्व्ह बँकेच्या फिट अँड प्रॉपर निकषानुसारची पात्रता. सहकारी बँकेतील तत्सम पदाचा किमान १० वर्षाचा अनुभव आवश्यक.
• अन्य पदांकरीता:
१) वाणिज्य शाखेची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, संगणक ज्ञान आवश्यक
२) प्राधान्य: JAIIB/CAIIB/GDC&A तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका. सहकारी बँकेतील तत्सम पदाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक.
वरील पदाकरिताचे अर्ज जाहिरात प्रसिध्द झालेपासून १५ दिवसात बँकेच्या ई-मेल तसेच पोस्टाव्दारे बँकेकडे सादर करावेत.
दि. २२ ऑगस्ट, २०२५
मा. अध्यक्ष / मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री गणेश सहकारी बँक मर्यादित, मुख्य कार्यालय: ५३/१ब/ २ व १४, विनायक नगर, नवी सांगवी, पिंपळे गुरव पुणे - ४११ ०६१.
फोन नं.:
०२०-२७२८४३०४, २७२८६३१४, ९१५६६६१४२५, ९१५६६६१५२५ ई-मेल आय डी : admin@shriganeshbank.co.in