श्री गजानन नागरी सहकारी बँकेचा पिंपळनेर शाखेचा ग्राहक मेळावा संपन्न!

बँकेची मजबूत आर्थिक स्थिती अन् आधुनिक सेवा; पिंपळनेर शाखेच्या प्रगतीचा ग्राहकांसमोर मांडला आलेख.
Shri Gajanan Nagari Sahakari Bank Pimpalner Branch - Beed News
डिजिटल बँकिंग आणि शासकीय योजनांची माहिती; ठेवीदार व व्यापाऱ्यांची मोठी उपस्थिती.
Published on

पिंपळनेर (बीड): श्री गजानन नागरी सहकारी बँक लि. बीडच्या पिंपळनेर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ग्राहक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यासोबतच ग्राहकांसाठी असणाऱ्या विविध आधुनिक बँकिंग सुविधा व शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाला बँकेचे उपाध्यक्ष जगदीश वासुदेव काळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुराव नरवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.आर. क्षीरसागर, सरव्यवस्थापक डॉ. एम.एस. शेख, गंगाधर घुमरे, सतीश पाटील, डॉ. शिंदे, कल्याण बप्पा खांडे, चंद्रकांत पेंढारे, लक्ष्मण नागरगोजे, अर्जुन जामकर, विक्रम नागरगोजे, कांता डोईफोडे, चंद्रकांत यादव, रामेश्वर सातपुते, राजा कुलकर्णी, गोकुळ सावंत, बिभीषण डोईफोडे, अशोक सुंदर शिरसाठ, देवीलाल चरखा, मिठू बिटके, उमेश आनेराव, अनिल ठाकरे, बंडू इंगोले, वरपे साहेब, ॲड. बारगजे यांच्यासह स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य, परिसरातील छोटे-मोठे व्यापारी, किराणा दुकानदार, ठेवीदार, उद्योजक, हॉटेल व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Shri Gajanan Nagari Sahakari Bank Beed
प्रमुख पदाधिकारी व विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा; कर्मचारी वर्गाचे विशेष परिश्रम.

बँकेच्या प्रगतीचा व सेवांचा आढावा:

कार्यक्रमाची प्रस्तावना अरुण बोगाणे यांनी केली. या प्रसंगी मार्गदर्शन करताना सरव्यवस्थापक डॉ. एम.एस. शेख यांनी बँकेची मजबूत आर्थिक स्थिती आणि पिंपळनेर शाखेच्या प्रगतीचा सविस्तर आलेख उपस्थितांसमोर मांडला.

या मेळाव्यात ग्राहकांना बँकेच्या विविध ठेव व कर्ज योजनांसह सीबीएस (CBS), एटीएम (ATM), फोन पे, मोबाईल बँकिंग यांसारख्या अत्याधुनिक डिजिटल सेवांची तसेच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. डिजिटल बँकिंगचा सुरक्षित आणि प्रभावी वापर कसा करावा, याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

या ग्राहक मेळाव्याला स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण बोगाणे, सहाय्यक व्यवस्थापक लांडे के., शाखा व्यवस्थापक अशोक दिगंबर घुमरे, बँकेचा कर्मचारी वर्ग व नित्य ठेव प्रतिनिधींनी विशेष परिश्रम घेतले.

Shri Gajanan Nagari Sahakari Bank Beed
Banco News
www.banco.news