

मंचर (पुणे): सहकारी बँकिंग क्षेत्रात आपले भक्कम स्थान निर्माण केलेल्या मंचर येथील शरद सहकारी बँक लि. कडून विविध पदांच्या ८६ जागांसाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र कार्यक्षेत्रात मुख्य कार्यालयासह २७ शाखांच्या माध्यमातून सुमारे ३,६०० कोटींचा व्यवसाय असणाऱ्या या बँकेत सिनियर ऑफिसर, ज्युनिअर ऑफिसर आणि लिपीक या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आणि अनुभवी बँक कर्मचाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे.
बँकेने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार भरती प्रक्रियेचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
सिनियर ऑफिसर (शाखाधिकारी) - १० जागा
वयोमर्यादा: ३० ते ४५ वर्षे.
पात्रता: पदवीधर / पदव्युत्तर. (JAIIB/CAIIB/MBA Finance/Marketing धारकांना प्राधान्य).
अनुभव: सहकारी, व्यापारी किंवा शेड्यूल्ड बँकेत संबंधित पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
ज्युनिअर ऑफिसर - १८ जागा
वयोमर्यादा: २५ ते ३५ वर्षे.
पात्रता: पदवीधर / पदव्युत्तर सोबत MS-CIT अनिवार्य. (JAIIB/CAIIB/GDC&A/MBA Finance असल्यास प्राधान्य).
अनुभव: सहकारी, व्यापारी किंवा शेड्यूल्ड बँकेत किमान ५ ते १० वर्षांचा अनुभव आवश्यक.
लिपीक (Clerk) - ५८ जागा
वयोमर्यादा: २१ ते ३० वर्षे.
पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर / पदव्युत्तर आणि MS-CIT अनिवार्य. (GDC&A असल्यास प्राधान्य).
अनुभव: बँकिंग क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
या भरती प्रक्रियेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ज्युनिअर ऑफिसर आणि लिपीक या दोन्ही पदांमधील तब्बल ८० टक्के जागा पुणे जिल्ह्यातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना आणि बँकिंग क्षेत्रातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ऑनलाईन अर्ज नोंदणी कालावधी: २८ ऑगस्ट २०२६ ते १९ सप्टेंबर २०२६
परीक्षा शुल्क: रु. ७२५/-
अधिकृत संकेतस्थळ: उमेदवारांनी (https://sharadbank.recruitlive.in/) या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे.
अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate): अर्ज सादर करताना मूळ अधिवास प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन परीक्षा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये घेतली जाईल.
परीक्षेमध्ये एका वेळी एकच प्रश्न स्क्रीनवर प्रदर्शित होईल. पुढील प्रश्नाकडे जाण्यापूर्वी उत्तर देणे किंवा तो प्रश्न सोडून देणे (Skip करणे) अनिवार्य असेल. एकदा उत्तर नोंदविल्यानंतर किंवा प्रश्न सोडल्यानंतर (Skip केल्यानंतर) पुन्हा मागे जाऊन उत्तरात बदल करता येणार नाही, असा महत्त्वाचा नियम बँकेने स्पष्ट केला आहे.
परीक्षा दिनांक, प्रवेशपत्र (Hall Ticket) आणि मुलाखतीची तारीख याबाबतची अद्ययावत माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली जाईल.
(अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्जासाठी शरद सहकारी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.)