

नागपूर जिल्ह्यात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवा श्री साई सहकारी पतसंस्थेचा वर्धापन दिन व स्नेह मिलन सोहळा ओबेराय पॅलेस, सेलिब्रेशन हॉल, ऑटोमोटिव्ह चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला सहकार क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश सातपुते यांनी भूषविले.
उद्घाटन नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी घाटे यांच्या हस्ते झाले.
या सोहळ्याला खालील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली—
राष्ट्रीय युवा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुभाष घाटे
नागपूरचे माजी उपमहापौर व जवाहर विद्यार्थी गृह, नागपूर (तेली समाज) अध्यक्ष श्री शेखर सावरबांधे
राज्य अन्न आयोग सदस्य श्री ईश्वरजी बाळबुधे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष श्री हरिभाऊजी किरपाणे
छत्तीसगड अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष श्री अजित कौशल
सम्राट अशोक अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष श्री महेंद्र बनसोड
दि प्रगतिशील नागरी सहकारी पतसंस्थेचे पालक संचालक श्री तुळशीराम मोहाडीकर
नारायण गुरु अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष श्री किरण रोकडे
सहकार भारती, नागपूर विभाग प्रमुख श्री संजय रोकडे
लाईफ लाईन महिला पतसंस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री नागेश्वर मदनकर
समता मागासवर्गीय अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष श्री देवाजी येरणे
मित्रजन महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सागर मेश्राम
ज्येष्ठ सल्लागार श्री सदाशिवराव भेंडे, श्री रमेश सातपुते
संस्था उपाध्यक्षा सौ. चंदा सातपुते
तसेच संचालक मंडळातील
सुरेश कोहाड, डॉ. शिवराज देशमुख, खोरबरा साहू, पंचराम पराते, सिताराम भेंडे, विजय चव्हाण, सोनलाल बनपाल, राजेंद्र झाडे, प्रकाश कांबळे, सौ. वंदना सातपुते, सौ. देवकाबाई भोंगाडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात सहकारी चळवळीत उल्लेखनीय योगदान देणारे व संस्थेच्या प्रगतीत हातभार लावणाऱ्या उत्कृष्ट ग्राहकांचा सत्कार करून पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना संस्था व्यवस्थापक श्री शेखर निमजे यांनी केली.
सूत्रसंचालन वसुली अधिकारी श्री प्रवीण कोल्हे यांनी सुरेखपणे पार पाडले.
संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा व वार्षिक अहवालाचा व्हिज्युअल प्रेझेंटेशन सहव्यवस्थापक श्री गणेश नंदनवार यांनी सादर केला.
संस्थेचे सर्व कर्मचारीवर्ग, अधिकारी, तसेच दैनिक प्रतिनिधी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, सदस्य आणि नागरिकांनी संस्थेच्या भावी प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.