
सटाणा मर्चटस् को.ऑप बॅकेच्या वतीने सभासदांच्या अपघात विमा कल्याण निधीतून दोन सभासदांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रूपयांचा धनादेश चेअरमन कल्पना येवला यांच्या हस्ते नुकताच सुपूर्त करण्यात आला.
समको बँकेच्या वतीने सभासदांसाठी असलेल्या अपघाती विमा योजनेद्वारे सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास सभासदांच्या वारसांना दोन लाख रूपये देण्यात येत असल्याचे यावेळी संबंधित सूत्रांनी सांगितले. या अनुषंगाने अपघातात मृत झालेल्या नरेंद्र पंडित वरखेडे व दीपक कौतीक अहिरे या सभासदांचे वारस विमल पंडित वरखेडे व अनिता दीपक अहिरे यांना प्रत्येकी दोन लाख रूपयांचा धनादेश आदा करण्यात आला.
यावेळी व्हा.चेअरमन चंद्रकांत सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी देविदास बागडे, संचालक पंकज ततार, जयवंत येवला, रूपाली कोठावदे, कैलास येवला, स्वप्नील बागड, व्ही.के. येवलकर, सचिन कोठावदे, महेश देवरे, अभिजीत सोनवणे, रमणलाल छाजेड, प्रविण बागड, भास्कर अमृतकार, प्रकाश सोनग्रा, दिलीप येवला, जगदीश मुंडावरे, तुषार खैरणार, विजय भांगडीया, दत्तात्रेय कापुरे, पियुष येवला आदी उपस्थित होते.