रिझर्व्ह बँकेचा निर्णय बदलणार तुमचा क्रेडिट स्कोअर गेम!

कर्ज नाकारलं जात होतं? EMI कमी कसा होईल? रिझर्व्ह बँकेच्या एका निर्णयाने कोट्यवधी कर्जदारांना दिलासा
Credit Score Reports
रिझर्व्ह बँकेचा निर्णय बदलणार तुमचा क्रेडिट स्कोअर गेम!
Published on

खराब किंवा वेळेवर अपडेट न होणाऱ्या क्रेडिट स्कोअरमुळे कर्ज आणि क्रेडिट कार्ड नाकारले जाणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) क्रेडिट स्कोअर अपडेट करण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे कर्ज, ईएमआय आणि क्रेडिट कार्ड अधिक स्वस्त आणि सहज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

काय आहे रिझर्व्ह बँकेचा नवा निर्णय?

रिझर्व्ह बँकेने २९ सप्टेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या मसुदा मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (CICs) दर १५ दिवसांऐवजी प्रत्येक आठवड्याला क्रेडिट स्कोअर अपडेट करतील. हा नियम १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहे.

सध्या क्रेडिट स्कोअर पंधरवड्यातून (१५ दिवसांतून) एकदाच अपडेट होतो. त्यामुळे कर्जफेड, थकबाकी मिटवणे किंवा सुधारित क्रेडिट स्कोअर असूनही त्याचा फायदा ग्राहकांना उशिरा मिळतो. नव्या नियमानंतर ही अडचण दूर होणार आहे.

क्रेडिट स्कोअर कधी अपडेट होणार?

रिझर्व्ह बँकेच्या मसुद्यानुसार, सीआयसीकडून क्रेडिट रिपोर्ट पुढील तारखांना नियमितपणे अपडेट केला जाईल – ७, १४, २१, २८ तारीख आणि महिन्याचा शेवटचा दिवस.

यामुळे ग्राहकांच्या आर्थिक स्थितीतील बदल जवळपास रिअल-टाइम स्वरूपात क्रेडिट रिपोर्टमध्ये दिसतील.

Credit Score Reports
कमी CIBIL स्कोअर? काळजी नको! ‘या’ ५ पर्यायांनी मिळू शकते कर्ज

बँकांवर काय जबाबदारी?

  • बँकांना आणि वित्तीय संस्थांना महिन्याची संपूर्ण क्रेडिट फाईल पुढील महिन्याच्या ३ तारखेपर्यंत सीआयसीकडे पाठवावी लागेल.

  • आठवड्याच्या अपडेटसाठी नवीन उघडलेली खाती, बंद खाती, खात्याच्या स्थितीत झालेले बदल, ग्राहकांनी केलेल्या दुरुस्त्या यासंबंधी माहिती पाठवावी लागेल.

  • हा डेटा दोन दिवसांच्या आत देणे बंधनकारक असेल.

  • वेळेत माहिती न दिल्यास सीआयसी ही बाब रिझर्व्ह बँकेच्या DAKSH पोर्टलवर नोंदवतील, ज्यामुळे बँकांवर कारवाई होऊ शकते.

ग्राहकांना काय फायदा होणार?

1.क्रेडिट स्कोअर जलद अपडेट झाल्याने कमी व्याजदरावर कर्ज मिळण्याची शक्यता वाढेल
2. EMI त्वरित कमी होऊ शकतो
3. चांगल्या क्रेडिट कार्ड ऑफर्स आणि क्रेडिट लिमिट वाढ मिळण्यास मदत
4. चुकांमुळे अडकलेले कर्ज अर्ज लवकर मंजूर होण्याची शक्यता

आज अनेक बँका व्याजदर क्रेडिट स्कोअरशी थेट जोडतात. त्यामुळे स्कोअर लवकर अपडेट झाला तर त्याचा फायदा त्वरित ग्राहकांना मिळू शकेल.

Credit Score Reports
क्रेडिट स्कोअर वाढवण्याचे सोपे उपाय!

बँकांनाही फायदा

या बदलामुळे बँकांना ग्राहकांचा अचूक, ताजा आणि विश्वासार्ह डेटा मिळेल.
यामुळे कर्ज मंजुरी प्रक्रियेतील जोखीम कमी होईल, तसेच योग्य ग्राहकांना योग्य व्याजदरावर कर्ज देणे अधिक सोपे होईल.

साप्ताहिक क्रेडिट स्कोअर अपडेटचा निर्णय हा रिझर्व्ह बँकेच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे आणि दूरगामी परिणाम करणारे पाऊल मानले जात आहे.
यामुळे क्रेडिट सिस्टीम अधिक पारदर्शक, वेगवान आणि विश्वासार्ह बनेल, तसेच सामान्य ग्राहकांना प्रत्यक्ष आर्थिक फायदा मिळणार आहे.

खराब क्रेडिट स्कोअरमुळे अडचणीत असलेल्या कर्जदारांसाठी हा निर्णय खऱ्या अर्थाने ‘गेमचेंजर’ ठरू शकतो.

Banco News
www.banco.news