नागरी सहकारी बँकांच्या ठेवींवरील व्याजदरांसाठी रिझर्व्ह बँकेचे नवे निर्देश जाहीर

ठेवीदारांसाठी पारदर्शक, एकसमान व्याजदर धोरण बंधनकारक
Reserve Bank of India
रिझर्व्ह बँकेचे नवे निर्देश जाहीर
Published on

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नागरी सहकारी बँकांतील (Urban Co-operative Banks) ठेवींवरील व्याजदरांबाबत महत्त्वाचे नवे निर्देश जाहीर केले आहेत. Reserve Bank of India (Urban Co-operative Banks – Interest Rate on Deposits) Directions, 2025 हे निर्देश 28 नोव्हेंबर 2025 रोजी रिझर्व्ह बँके च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतर तात्काळ लागू झाले आहेत.

या नव्या निर्देशांमुळे नागरी सहकारी बँकांच्या ठेवी धोरणात एकसमानता, पारदर्शकता आणि ठेवीदारांचे हित संरक्षण यावर भर देण्यात आला आहे.

चालू खात्यावर व्याज नाही
चालू खात्यांवर कोणतेही व्याज देण्यास मनाई कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, मृत खातेदाराच्या चालू खात्यातील रकमेवर देय तारखेपर्यंत बचत खात्याच्या दराने व्याज दिले जाणार आहे.

बचत खात्यांवरील व्याज – Daily Product पद्धत
बचत खात्यांवरील व्याज दैनंदिन शिल्लक (Daily Product Basis) पद्धतीने मोजले जाईल.
₹1 लाखांपर्यंत एकसमान व्याजदर, तर त्यापेक्षा जास्त शिल्लकीसाठी वेगळे व्याजदर लागू करता येणार

मुदत ठेवींवरील (FD) व्याजदर
मुदत ठेवींवरील व्याजदर ठेवीचा कालावधी, रकमेचा आकार (Bulk Deposit) आणि अकाली परतफेड सुविधेवर आधारित असतील.
₹1 कोटीपर्यंतच्या वैयक्तिक व HUF ठेवींना अकाली परतफेड सुविधा बंधनकारक करण्यात आली आहे

Bulk Depositची नवी व्याख्या
▪️ टियर-3 व टियर-4 शेड्युल्ड UCBs – ₹1 कोटी व त्यावरील ठेवी
▪️ इतर सहकारी बँका – ₹15 लाख व त्यावरील ठेवी

ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष FD योजना
नागरी सहकारी बँकांना ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त व्याजदराच्या स्वतंत्र मुदत ठेव योजना सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे.

बँक कर्मचाऱ्यांना अतिरिक्त व्याज
बँक कर्मचारी, निवृत्त कर्मचारी व त्यांच्या संघटनांना ठराविक अटींवर 1% अतिरिक्त व्याज देण्याची मुभा.

NRE / NRO व FCNR(B) ठेवींबाबत महत्त्वाचे बदल

🔸 NRE / NRO ठेवींवरील व्याजदर देशांतर्गत ठेवींपेक्षा जास्त असू शकणार नाहीत.
🔸 NRE बचत खात्यावर कोणताही तारण (Lien) ठेवण्यास मनाई.
🔸 FCNR(B) ठेवींवरील व्याजदर Overnight ARR / Swap Rate शी जोडले जाणार.
🔸 FCNR(B) ठेवींवर कमाल 5 वर्षांची मुदत मर्यादा कायम.

बँकांसाठी कडक मनाई

❌ ठेवी आकर्षित करण्यासाठी लॉटरी, बक्षिसे, फ्री ट्रिप्स यास बंदी
❌ एजंटमार्फत अनैतिक ठेवी संकलनास मनाई
❌ केवळ कंपाउंडेड परतावा दाखवणाऱ्या जाहिरातींवर बंदी
❌ राजकीय पक्ष, व्यापारी संस्था यांच्या नावाने बचत खाते उघडण्यास मनाई

जुने निर्देश रद्द

या नव्या निर्देशांमुळे शहरी सहकारी बँकांच्या ठेवींवरील व्याजदरांबाबतचे सर्व जुने रिझर्व्ह बँक परिपत्रक व मार्गदर्शक सूचना रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, पूर्वी घेतलेले निर्णय व सुरू असलेल्या कायदेशीर कारवाया यावर त्याचा परिणाम होणार नाही.

Attachment
PDF
Reserve Bank of India (Urban Co-operative Banks – Interest Rate on Deposits) Directions, 2025
Preview
Banco News
www.banco.news