भारतीय रिझर्व्ह बँकेत अधिकाऱ्यांच्या पदांसाठी थेट भरती

१२० जागांवर नेमणुकीसाठी मागविलेत ऑनलाईन अर्ज
RBI
RBI
Published on

भारतीय रिझर्व्ह बँक सेवासमिती

RESERVE BANK OF INDIA SERVICES BOARD

जाहिरात क्र. RBISB/BA/03/2025-26

भारतीय रिझर्व्ह बँकेत ग्रेड 'बी' (सामान्य / आनीअवि / सांसूप्रवि) संवर्गातील (परिविक्षाधीन) अधिकाऱ्यांच्या पदांसाठी थेट भरती (सीभ) – पॅनेल वर्ष २०२५

भारतीय रिझर्व्ह बँकेत (भारिब) पॅनेल वर्ष २०२५ साठी खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत:

क्र.सं., पदाचे नाव, रिक्त पदे -एकूण रिक्त पदे- १२०

१) ग्रेड 'बी' (सामान्य) संवर्गातील अधिकाऱ्यांची थेट भरती- ८३

२) ग्रेड 'बी'-आर्थिक व धोरण संशोधन विभाग (आनीअवि) मधील अधिकाऱ्यांची थेट भरती- १७

३) ग्रेड 'बी'-सांख्यिकी व माहिती व्यवस्थापन विभाग (सांसूप्रवि) मधील अधिकाऱ्यांची थेट भरती -२०

पात्रता निकष, रिक्त पदांतील आरक्षण, निवड योजना, ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पद्धत व इतर सर्व सूचनांबाबत अधिक माहितीकरिता कृपया दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी बँकेच्या संकेतस्थळावर ([www.rbi.org.in](http://www.rbi.org.in)) तसेच दिनांक १३ सप्टेंबर २०२५ च्या एम्प्लॉयमेंट न्यूज / रोजगार समाचार अंकात/अनुवर्ती अंकात प्रकाशित होणारी सविस्तर जाहिरात पाहावी.

उमेदवारांनी वरील पदांसाठी बँकेच्या संकेतस्थळावर https://www.rbi.org.in भेट द्यावी.

Banco News
www.banco.news