रिझर्व्ह बँकेत पूर्णवेळ कंत्राटी तत्वावर विविध पदांसाठी तज्ज्ञ भरती

विविध तांत्रिक आणि वित्तीय क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी मोठी संधी
Reserve bank of India
रिझर्व्ह बँकेत पूर्णवेळ कंत्राटी तत्वावर विविध पदांसाठी तज्ज्ञ भरती
Published on

मुंबई: देशाच्या मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये विविध तांत्रिक आणि वित्तीय क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. RBI सर्व्हिसेस बोर्ड मार्फत लॅटरल रिक्रूटमेंट (Lateral Recruitment) प्रक्रियेद्वारे एकूण 93 पदे भरली जाणार असून, ही भरती पूर्णवेळ करार तत्वावर केली जाणार आहे.

या भरतीमध्ये डेटा सायन्स, आयटी, सायबर सुरक्षा, रिस्क मॅनेजमेंट, फायनान्स, अकाउंट्स आणि पॉलिसी रिसर्च यांसारख्या उच्च कौशल्य आवश्यक असलेल्या क्षेत्रांचा समावेश आहे.

भरतीचे उद्दिष्ट

RBIने ही भरती आधुनिक डेटा सायन्स, सायबर सुरक्षा, आयटी सिस्टम, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट आणि वित्तीय विश्लेषण यांसारख्या अत्याधुनिक कौशल्यांच्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांसाठी जाहीर केली आहे. बँकेच्या धोरणनिर्मिती, आर्थिक पर्यवेक्षण आणि वित्तीय स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी हे तज्ज्ञ महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

कोणत्या विभागांमध्ये भरती?

आरबीआयच्या पुढील महत्त्वाच्या विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे:

  • Department of Information Technology (DIT)

  • Department of Supervision (DoS)

  • Premises Department

पदांचा तपशील

भरतीत खालील प्रमुख पदांचा समावेश आहे:

डेटा आणि आयटी क्षेत्र:

  • डेटा सायंटिस्ट

  • डेटा इंजिनिअर

  • AI / ML स्पेशालिस्ट

  • IT सिक्युरिटी एक्स्पर्ट

  • IT सिस्टम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर

  • IT प्रोजेक्ट अ‍ॅडमिनिस्ट्रेटर

  • सायबर सिक्युरिटी अ‍ॅनालिस्ट

  • नेटवर्क अ‍ॅडमिनिस्ट्रेटर

रिस्क व वित्तीय क्षेत्र:

  • मार्केट व लिक्विडिटी रिस्क स्पेशालिस्ट

  • क्रेडिट रिस्क अ‍ॅनालिस्ट

  • ऑपरेशनल रिस्क अ‍ॅनालिस्ट

  • अकाउंट्स स्पेशालिस्ट

  • डेटा अ‍ॅनालिस्ट (Micro Data Analytics)

  • बँकिंग डोमेन स्पेशालिस्ट

  • डेटा सायंटिस्ट (Data Modelling / Advanced Analytics)

  • बँक एक्झामिनर (Liquidity Risk)

  • सीनियर बँक एक्झामिनर (Liquidity Risk)

  • पॉलिसी रिसर्च अ‍ॅनालिस्ट

  • बिझनेस व फायनान्शियल रिस्क अ‍ॅनालिस्ट

प्रोजेक्ट व प्रशासनिक पदे:

  • प्रोजेक्ट मॅनेजर

  • प्रोग्राम कोऑर्डिनेटर (CoS)

पदे ग्रेड C, D आणि E स्तरावर आहेत.

एकूण जागा व आरक्षण

  • एकूण पदे : 93

  • जनरल, OBC, SC, ST, EWS आणि दिव्यांग (PwBD) प्रवर्गांसाठी सरकारी नियमानुसार आरक्षण लागू राहील.

  • PwBD उमेदवारांसाठी आडवे (Horizontal) आरक्षण देण्यात येणार आहे.

पात्रता व अनुभव

  • वय: साधारण 25 ते 62 वर्षांपर्यंत (पदानुसार भिन्न)

  • शैक्षणिक पात्रता: BE/BTech, MTech, MCA, MBA, CA, CFA, FRM, अर्थशास्त्र, डेटा सायन्स, आकडेवारी, फायनान्स

  • अनुभव: 3 ते 10 वर्षांचा संबंधित क्षेत्रात अनुभव आवश्यक

  • विशेष कौशल्ये: डेटा अ‍ॅनालिटिक्स टूल्स (Python, R, SQL), मशीन लर्निंग, बिग डेटा, सायबर सिक्युरिटी, नेटवर्क व्यवस्थापन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट

पदानुसार संबंधित वित्तीय संस्था, बँकिंग, IT सेवा कंपन्या किंवा सल्लागार संस्थांमध्ये अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

वेतन व फायदे

  • ग्रेड C (Level 3): ₹3,10,000 – ₹4,10,000

  • ग्रेड D (Level 4): ₹4,30,000 – ₹5,10,000

  • ग्रेड E (Level 5): ₹4,80,000 – ₹6,00,000

वेतनासोबत हाऊसिंग अलाउन्स, वार्षिक 30 दिवसांची सुट्टी, टीए/एचए आणि आपत्कालीन डिस्पेन्सरी सुविधा दिली जाणार आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या निवास सुविधा नाहीत.

अर्ज प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज सुरू: 17 डिसेंबर 2025

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 6 जानेवारी 2026 (सायं. 6 वाजेपर्यंत)

अर्ज ऑनलाइन करून सर्व शैक्षणिक, अनुभव व प्रमाणपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.

नियुक्तीचे ठिकाण

बहुतेक सर्व पदांसाठी मुंबई हे कार्यस्थळ असेल. काही आयटी पदांसाठी आरबीआयची डेटा सेंटर्स ही नियुक्ती स्थळे असतील.

रिझर्व्ह बँकेकडून तंत्रज्ञानावर भर

डिजिटल बँकिंग, सायबर धोके, डेटा-आधारित धोरणनिर्मिती आणि आर्थिक स्थैर्य या पार्श्वभूमीवर आरबीआय तांत्रिक तज्ज्ञांवर अधिक भर देत असल्याचे या भरतीवरून स्पष्ट होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बँकिंग पर्यवेक्षण अधिक मजबूत करण्याचा हा प्रयत्न असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

निवड प्रक्रिया

  • इंटरव्ह्यू आधारित

  • अर्जाची गुणवत्ता, अनुभव, कौशल्ये पाहून अंतिम निर्णय

  • कराराच्या कालावधीची 3 वर्षे, आवश्यकतेनुसार 2 वर्षांनी वाढ

अधिक माहिती आणि अर्जासाठी: RBI Lateral Recruitment 2025

महत्त्वाचे

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो.

Attachment
PDF
Lateral Recruitment RBI 17122025
Preview
Banco News
www.banco.news