

कोल्हापूर : राजर्षि शाहू गव्हर्नमेंट सर्व्हंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कोल्हापूर या सात जिल्ह्यांत कार्यक्षेत्र असलेल्या आणि सुमारे ४१५ कोटी रुपयांचा व्यवसाय असलेल्या नामांकित सहकारी बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि जनरल मॅनेजर (GM) या महत्त्वाच्या पदांसाठी पात्र व अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी उमेदवाराचे किमान वय ४५ वर्षे असणे आवश्यक असून नियुक्तीच्या वेळी वय ४५ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे.
उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर असावा. CAIIB पदविकाधारकांना प्राधान्य देण्यात येणार असून डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स, डिप्लोमा इन को-ऑपरेटिव्ह बिझनेस मॅनेजमेंट, सहकार व वित्त पदविका, चार्टर्ड अकाउंटंट (CA) किंवा एमबीए (MBA) असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाईल.
बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर किमान ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
जनरल मॅनेजर पदासाठी उमेदवाराचे किमान वय ३० वर्षे असावे.
शैक्षणिक पात्रतेमध्ये पदवीधर, एम.कॉम, एमबीए (फायनान्स) तसेच JAIIB / CAIIB पात्रता, डिप्लोमा इन को-ऑपरेटिव्ह बिझनेस मॅनेजमेंट किंवा तत्सम पात्रता अपेक्षित आहे. चार्टर्ड अकाउंटंट / कॉस्ट अकाउंटंट उमेदवारांनाही प्राधान्य देण्यात येईल.
उमेदवाराकडे संगणकाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.
सहायक सरव्यवस्थापक किंवा सरव्यवस्थापक पदावर किमान ५ वर्षांचा अनुभव, मुख्यालयातील विविध कामकाज, आरबीआय परिपत्रकांचा अभ्यास, नवीन सहकारी कायदा, कामगार कायदे, प्रशासकीय व्यवस्थापन यांचे ज्ञान असणे अपेक्षित आहे.
वरील सर्व पदांसाठी उमेदवारांकडे
बँकिंग क्षेत्राचे सखोल ज्ञान
संगणक कौशल्य
उत्तम संभाषण व संघटन कौशल्य
असणे आवश्यक आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत संबंधित पदाचा उल्लेख करून
बायोडाटा, छायाचित्र, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या प्रती, अपेक्षित पगार व संपूर्ण माहिती
मा. अध्यक्ष यांच्या नावाने ई-मेल किंवा पोस्टाने पाठवाव्यात.
राजर्षि शाहू गव्हर्नमेंट सर्व्हंट्स को-ऑप. बँक लि.
७४६, ई वॉर्ड, ‘राजर्षि शाहू भवन’,
भास्करराव जाधव रोड, ३ री गल्ली,
शाहूपुरी, कोल्हापूर – ४१६००९
संपर्क : ८८८८८३१५३९
ई-मेल : ceo@rsgsbank.co.in
विशेष पात्रता असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत अर्हता व वयोमर्यादेत शिथिलता देण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवलेला आहे, असे बँकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ही भरती प्रक्रिया बँकेच्या प्रशासकीय व व्यावसायिक कार्यक्षमतेला अधिक बळ देणारी ठरणार असून सहकारी बँकिंग क्षेत्रातील अनुभवी अधिकाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे.