राजर्षी शाहू बँकेची ४३ वी वार्षिक सभा उत्साहात; सभासदांसाठी ९% लाभांश जाहीर

४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षांची घोषणा; लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार आणि नवीन ५ शाखा उघडणार
Rajarshi Shahu Sahakari Bank Pune - AGM News 2026 - Financial Results 2026
सातव हॉल येथील सभेत कामकाज आणि कामगिरीबद्दल सभासदांकडून समाधान व्यक्त
Published on

पुणे: राजर्षी शाहू सहकारी बँकेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. २७ ऑगस्ट २०२६) सातव हॉल, सहकार नगर, पर्वती, पुणे येथे अतिशय खेळीमेळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आपल्या सभासदांसाठी ९% लाभांश (Dividend) जाहीर केला आहे.

सभेचे अध्यक्षपद भूषवताना बँकेचे अध्यक्ष श्री. पद्माकर पवार यांनी बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आणि लेखापरीक्षणाचा सविस्तर अहवाल मांडला.

बँकेने आर्थिक वर्षात एकूण १,६८७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. या कालावधीत बँकेला ८.३० कोटी रुपयांचा एकूण नफा झाला असून बँकेला 'अ' (Class 'A') हा ऑडिट वर्ग मिळाला आहे. बँकेचा भागभांडवल पर्याप्तता रेशो (CRAR) २२.८६% इतका असून बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत आहे. तसेच बँकेचा नेट एनपीए (Net NPA) १% पेक्षा कमी राखण्यात यश आले आहे.

राज्यभर ५ नवीन शाखा आणि डिजिटल क्रांतीची घोषणा

अध्यक्ष पद्माकर पवार यांनी माहिती दिली की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यासाठी मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर बँक चालू आर्थिक वर्षात राज्यभरात ५ नवीन शाखा उघडणार आहे. बँकेने संतुलित कर्ज वाटप आणि जोखमीचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे एनपीए नियंत्रित ठेवण्यात यश आले आहे.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बाळासाहेब डोईफोडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून सभेचे इतिवृत्त वाचन केले. रिझर्व्ह बँकेच्या नवीन धोरणांची माहिती देताना त्यांनी सांगितले की, बँक लवकरच डिजिटल अकाउंट ओपनिंग, नेट बँकिंग आणि युपीआय (UPI) साठी स्वतःचा स्विच व हँडल पुढील काही महिन्यांत ग्राहकांच्या सेवेत दाखल करणार आहे.

गुणवंत विद्यार्थी आणि मान्यवरांचा सत्कार

सभेदरम्यान सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बँकेच्या संचालक, सभासद व खातेदारांचा सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केलेल्या सभासदांच्या पाल्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष श्री.पद्माकर पवार, उपाध्यक्ष श्री.अभय मोहिते, ज्येष्ठ संचालक श्री. सुधाकर पन्हाळे, श्री. शांताराम धनकवडे, सौ. कमल व्यवहारे, श्रीमती मंगला जाधव, श्री. सचिन पन्हाळे, श्री. सुदाम झेंडे, श्री. सतीश नाईक, श्रीमती श्यामकौर शिंदे, सौ. शिवाली भोसले, श्री. लक्ष्मण जाधव, डॉ. श्री. सुनील जगताप, श्रीमती आनंदी कुलकर्णी, श्री. सुबीर कोतवाल, श्री. मनन शिंदे, कार्यलक्षी संचालक श्री. सुनील देसाई, श्री. प्रमोद जाधव, व्यवस्थापन मंडळ सदस्य श्री. किशोर कापसे, श्री. दिगंबर कानगो, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बाळासाहेब डोईफोडे यांच्यासह बहुसंख्येने सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रमेश सुतार व श्री. अभिजित शितोळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष श्री. अभय मोहिते यांनी मानले.

Banco News
www.banco.news