पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेत अधिकारी पदांची भरती

प्रेरित उमेदवारांना केलेय अर्जाचे आवाहन
पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक
पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक
Published on

पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि., पुणे ही पुण्यातील एक आघाडीची सहकारी बँक असून तिचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. या बँकेचा एकूण व्यवसाय २७०० कोटी रुपयांहून अधिक असून सध्या बँकेसाठी खालील पदांसाठी प्रेरित, गतिमान आणि परिणामाभिमुख अधिकारी व कार्यकारी अधिकारी यांची आवश्यकता आहे.

१) मुख्य कार्यकारी अधिकारी

२) महाव्यवस्थापक

३) उपमहाव्यवस्थापक

४) सहायक महाव्यवस्थापक

५) शाखा व्यवस्थापक

६) लेखापरीक्षण अधिकारी

७) आयटी अनुप्रयोग विकासक

८) सनदी लेखापाल

वरील प्रत्येक पदासाठी आवश्यक असलेली अट,अर्हता, अनुभव, वयोमर्यादा इत्यादींची माहिती बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नमूद केलेला अर्जाचा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध असून पूर्ण भरलेला अर्ज फक्त संकेतस्थळावरूनच सादर करावा. आवश्यक अर्हता पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांनी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. नमूद मुदतीनंतर आलेले किंवा अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

योग्य उच्च शैक्षणिक अर्हता, विशेष कौशल्ये व अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी संचालक मंडळास आवश्यक अटी शिथिल करण्याचा अधिकार राहील.

पुणे, दिनांक: २२ ऑगस्ट २०२५

अध्यक्ष

पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि., पुणे.

मुख्य कार्यालय: ४७७/४७८, पहिला मजला, मार्केट यार्ड, गुलटेकडी, पुणे ४११०३७

दूरध्वनी क्र.: 7066051999 / 7066050999

वेबसाईट: [www.punepeoplesbank.com] (http://www.punepeoplesbank.com)

https://www.punepeoplesbank.com/careers

Banco News
www.banco.news