

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशन लि., कोल्हापूर यांच्या माध्यमातून पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि., पुणे (मल्टीस्टेट बँक) यांनी लेखनिक (Clerk) पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पुणे शहरात मुख्यालय असलेल्या या अग्रेसर सहकारी मल्टीस्टेट बँकेत नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे.
पदाचे नाव: लेखनिक (Clerk)
संस्था: Pune People’s Co-op. Bank Ltd., Pune (Multi-State Bank)
भरती प्रक्रिया: ऑनलाइन अर्ज
भरतीसंबंधी सर्व माहिती कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी www.kopbankasso.co.in या संकेतस्थळाला भेट देऊन दिलेल्या नमुन्यामध्ये ऑनलाइन अर्ज भरावा.
जाहीरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज स्वीकार सुरू
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: २४ डिसेंबर २०२५
अंतिम वेळ: सांयकाळी ५.०० वाजेपर्यंत
अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, नमूद केलेल्या कालावधीत अर्ज प्राप्त न झाल्यास ते ग्राह्य धरले जाणार नाहीत.
बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या, सहकारी क्षेत्रातील स्थिर नोकरी शोधणाऱ्या तरुण-तरुणींनी ही संधी गमावू नये, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.